Raj Kundra sakal media
मुंबई

मुंबई पोलिसांची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय नाही - HC

सुनिता महामुनकर

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography case) अटक केलेल्या उद्योगपती राज कुंद्राला (Raj kundra) तातडीने दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai high Court) आज नकार दिला. मुंबई पोलिसांची (Mumbai Police) बाजू ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. (Without Mumbai Police statements no decision will be taken in raj kundra case says high court-nss91)

कुंद्राला पोलिसांनी ता. 19 रोजी अटक केली आहे. अश्लील चित्रफिती तयार केल्याचा आरोप पोलिसांनी त्याच्यावर ठेवला आहे. दंंडाधिकारी न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आज सुनावली. कुंद्राने त्याच्या अटकेला आव्हान देणारी याचिका एड रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत केली आहे. पोलिसांनी जप्त केलेला व्हिडीओचा कंटेंट हा पोर्नोग्राफी व्याख्येत बसत नाही. संबंधित कंटेंट या शौर्ट फिल्म्स असून एका विशिष्ट वर्गासाठी तयार केलेल्या आहेत, असे यामध्ये म्हटले आहे. आज तातडीने याचिकेचा उल्लेख न्या अजय गडकरी यांच्या पुढे एड पोंडा यांनी केला. मात्र न्यायालयाने यावर तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. या प्रकरणात मुंबई पोलिसांची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश देणार नाही, असे न्या गडकरी यांनी सांगितले. तसेच याचिकेत उपस्थित मुद्यांवर लेखी खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले.

न्यायालयाने आज कुंद्राला अंतरिम दिलासा द्यावा अशी मागणी पोंडा यांनी केली. मात्र ही मागणी न्या गडकरी यांनी अमान्य केली. अभियोग पक्षाला बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय अंतरिम निर्णय देणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पोलिसांनी चौकशीला बोलविले होते पण त्यांनी कोणतीही कल्पना न देता अटक केली, असा आरोप कुंद्राने केला आहे. तसेच पोलीस जो जप्त केलेला कंटेंट अश्लील म्हणून दावा करत आहेत तो पोर्नोग्राफी कायद्याच्या कक्षेत येत नाही तर या शौर्ट फिल्म्स आहेत, असा बचाव कुंद्राने केला आहे. मुंबई पोलिसांनी या पोर्नोग्राफी प्रकरणात कुंद्राला मुख्य सूत्रधार म्हणून घोषित केले आहे. भादंवि कलम 420, 292,293 इ नुसार अश्लील साहित्य तयार करणे, फसवणूक इ. आरोपांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार ठेवले आहेत. त्याच्या कार्यालयातून सुमारे 51 अश्लील व्हिडीओ पोलिसांना सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee TMC Resignation : ममता बॅनर्जींना तगडा झटका; अत्यंत विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT