मुंबई

विनयभंगाची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला अटक; कट रचून दोन पोलिसांना अडकण्याचा प्रयत्न

अनिश पाटील


मुंबई - आपल्या निलंबनाला जबाबदार धरून घाटकोपर पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने महिलेच्या मदतीने दोन सरका-यांना अडकवण्याचा कट रचला. या महिलेने संबंधीत पोलिसांवर बलात्कार व मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्तांनी याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन केले असता हा आरोप खोटा असल्याचे निष्पन्न झाले. अखेर याप्रकरणी महिलाला अटक करण्यात आली असून आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचा सध्या शोध सुरू आहे.

तक्रारीनुसार ही घटना जानेवारी महिन्यात घडली असून याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात दोन पोलिसांसह एक खबरी महिला व इतर आरोपी महिलेच्या घरी आले. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. पुढे तिचा गर्भपात झाला. बलात्काराचा प्रतिकार करणा-या या महिलेच्या मुलीचाही विनयभंग करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारी बद्दल संशय आल्यामुळे पोलिस उपायुक्त(परिमंडळ-7) प्रशांत कदम यांनी याप्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक केली. त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता 11 जानेवारीला आरोपींपैकी एक पोलिस तपासासाठी गुजरातमध्ये होता. तसेच दुसरी घटना घडली, त्यावेळी म्हणजे 15 जानेवारीला दोन आरोपी पोलिस पोलिस ठाण्यात उपस्थित होते.

या महिलेच्या मोबाईलची माहिती घेतली असता ही महिला एका उपनिरीक्षकाच्या संपर्कात होती. या पोलिस उपनिरीक्षकाविरोधात दाखल एका प्रकरणामुळे त्याला निलंबीत करण्यात आले होते. त्यासाठी हे दोन पोलिस जबाबदार असल्याचे ठरवून पोलिस उपनिरीक्षकाने हा कट रचला होता. याप्रकरणी 120(ब) अंतर्गत कट रचल्याचा गुन्हा दाखल करून बलात्काराची तक्रार करणा-या महिलेला शुक्रवारी अटक करण्यात आली. पोलिस सध्या आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचा शोध घेत आहेत.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT