बदलापूर : कुळकर्णी कुटुबीयांनी घरात पाळलेली कुत्री. (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)
बदलापूर : कुळकर्णी कुटुबीयांनी घरात पाळलेली कुत्री. (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी) 
मुंबई

बदलापुरातील महिलेने पाळले तब्बल 25 कुत्रे

गिरीश त्रिवेदी

बदलापूर : जिल्ह्यात भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना बदलापूरमधील कुळकर्णी कुटुंबीयांनी २५ भटक्‍या कुत्र्यांना आसरा दिला. मात्र, पालिकेत याबाबत तक्रार केल्याने आता नगरपालिकेने कुळकर्णी यांना घरातील कुत्रे काढून टाकण्याची सूचना केली आहे. मात्र, घरातील सदस्यांप्रमाणे पाळून मोठ्या केलेल्या या मुक्‍या कुत्र्यांना सोडणार कुठे? असा सवाल कुळकर्णी कुटुंबीयांना पडला आहे. 

बदलापूरमधील मांजर्ली या भागात हरी ओम अपार्टमेंटमध्ये आश्‍लेषा कुळकर्णी आणि तिची आई राहतात. २०१८ मध्ये या इमारतीबाहेर एका कुत्रीने पाच पिल्लांना जन्म दिला होता. त्या पाच पिल्लांमधील दोन पिल्ले गाडी खाली येऊन मृत्युमुखी पडली. मुक्‍या जीवांचा बळी गेलेला पाहून आश्‍लेषा हिने पिल्लांची आई आणि तीन पिल्ले घरी आणली. घरातील सदस्याप्रमाणे त्यांचे संगोपन केले. या पिल्लांची वंशावळ वाढून आजमितीस पंधरावर गेली आहे. २६ जुलैला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडत असलेल्या दहा कुत्र्यांना वाचवून आश्‍लेषा हिने आपल्या घरी आणले आणि त्यांचे आजपर्यंत संगोपन केले. 

दरम्यान, कुत्र्यांचा आवाज आणि वावर वाढल्याने इमारतीमधील नागरिक त्रस्त व भयभीत झाले आहेत. याबाबत रहिवाशांनी बदलापूर नगरपालिकेत तक्रार केल्याने आता पालिकेने कुळकर्णी यांच्या घरात असलेली कुत्री काढून टाकण्याची सूचना केली आहे. मात्र, घरातील सदस्याप्रमाणे वाढवलेल्या या कुत्र्यांना सोडणार कुठे? असा सवाल कुळकर्णी यांनी केला आहे. 

नागरिकांची तक्रार रास्त : मुख्याधिकारी
पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे याना विचारले असता कुळकर्णी कुटुंबीयांनी भटक्‍या कुत्र्यांचे संगोपन केले ही चांगली बाब आहे. मात्र, ते एका इमारतीमध्ये राहतात. त्यात अनेक सदनिका असून भटकी कुत्री जिन्यात, व्हरांड्यात, मोकळ्या जागी घाण करतात, भूंकत असतात. अशा वेळी इमारतीत ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान-लहान मुलांना कुत्री चावतील की काय, अशी सतत भीती वाटत असते. या भीतीपोटी नागरिकांनी पालिकेकडे केलेली तक्रार ही रास्त आहे. कुळकर्णी यांनी या भटक्‍या कुत्र्यांना वेगळ्या डॉर्मेटरीमध्ये ठेवावे, असे मुख्याधिकारी बोरसे यांनी सांगितले.   
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT