Woman defrauded of bitcoin investment cyber crime police mumbai sakal
मुंबई

Mumbai Crime : बिटकाॅईन गुंतवणुकीतून महिलेची फसवणूक; 10 जणांना 6 लाखांचा गंडा

बिटकाॅईनमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अल्पावधीत भरपूर परतावा मिळेल असे सांगितले.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - बिटकाॅईनमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे लालच दाखवत 10 जणांची तब्बल 6 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये डोंबिवली मधील एका महिलेचा देखील समावेश आहे.

गेल्या महिन्याच्या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून हा फसवणुकीचा प्रकार घडला. डोंबिवली मधील नूतन यांच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी भुरट्या विरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, ऑनलाईनच्या माध्यमातून एका भुरट्याने ऑलीव्हा 43 या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तक्रारदार नूतन यांच्याशी संपर्क साधला. बिटकाॅईनमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अल्पावधीत भरपूर परतावा मिळेल असे सांगितले.

अशाप्रकारची माहिती भुरट्याने इतर 10 जणांना दिली. अल्पावधीत अधिकची रक्कम गुंतवणुकीवर मिळणार असल्याने 11 गुंतवणूकदारांनी भुरट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन जून, जुलै महिन्याच्या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून गुंतवणूक केली.

फसवणूक झालेल्या नतून सावंत यांनी आपल्या बँक खात्यामधून 6 लाख 54 हजार रुपयांची रक्कम भुरट्याने दिलेल्या बँक खात्यात वळती केली. दोन महिने होत आले तरी आकर्षक परतावा मिळत नाही म्हणून तो मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी बुट्याच्या मागे तगादा लावला.

त्याने टाळाटाळ सुूरू केली. आकर्षक परतावा नसेल तर किमान आमची मूळ किमत परत करा, अशी मागणी गुंतवणूकदारांनी सुरू केली. त्यालाही बुट्याने प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर गुंतवणूकदारांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT