Dombivli crime news esakal
मुंबई

Dombivli News: मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना!

Dombivli Shocking incident : डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोड वरील विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करत होती.

Sandip Kapde

डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे.  मित्रांसोबत मस्करी करताना एका महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना डोंबिवली कल्याण शीळ रोड वर घडली आहे. मृत महिला नगीनादेवी मंजिराम असे तिचे नाव असून, ती त्या इमारतीमध्ये सफाईचे काम करत होती. ती पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.

घटना कशी घडली?

डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोड वरील विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करत होती. नगीनादेवी डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत.

आज दुपारच्या सुमारास नगीनादेवी तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसलेली असताना तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याच दरम्यान तिच्या सहकाऱ्याचा तिला हात लागला व नगीनादेवीचा तोल गेल्याने ती क्षणार्धात तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली.

पोलिसांचा तपास-

या घटनेनंतर नगीनादेवीच्या सहकाऱ्यांचा बंटी नावाचा तरुणाचाही तोल गेला. मात्र त्याला आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी वाचविले. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. मानपाडा पोलिसांनी या घटनेबाबत सखोल तपास सुरू केला असून, पुढील कारवाईसाठी आवश्यक माहिती गोळा केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT