Mumbai Manhole Women Death Esakal
मुंबई

Mumbai Manhole Womens Death: मुंबईत मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, BMC आयुक्तांनी उचलले मोठे पाऊल

Womens In Mumbai Fells In Manhole: अंधेरी पूर्व येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) गेट क्रमांक आठजवळ बुधवारी रात्री ९.२० वाजता ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

आशुतोष मसगौंडे

मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण सध्या राज्यभर तापत आहे. अशात आता बीएमसी आयुक्तांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश बीएमसी आयुक्तांनी दिले आहेत.

अंधेरी पूर्व येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) गेट क्रमांक आठजवळ बुधवारी रात्री ९.२० वाजता ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

विमल अनिल गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातानंतर स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाला कळवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर महिलेला नाल्यातून बाहेर काढून कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे महिलेला मृत घोषित करण्यात आले.

गुरुवारी जारी केलेल्या एका पत्रकात, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सांगितले की, उपमहापालिका आयुक्त (झोन 3) देविदास क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समिती तीन दिवसांत या घटनेचा अहवाल सादर करेल.

मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र अंबुलगेकर आणि मुख्य अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ हे समितीचे अन्य दोन सदस्य आहेत.

मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर थोडाफार परिणाम झाला होता. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरही मोठा परिणाम झाला आहे.

मुंबईची स्थिती पावसामुळे अत्यंत बिकट आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

अनेक भागातून रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी साचल्याच्या बातम्या येत आहेत. लोकांना घरातून जीवनावश्यक वस्तू काढून सुरक्षित स्थळी नेण्यास भाग पाडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT