Mumbai Police Esakal
मुंबई

Mumbai Police: ...अन् तो पोलीस स्वतःच झाला रुग्णवाहिका, सतर्कतेचे सर्व स्तरातून होतंय कौतुक

अनेक वेळा आपल्याला वर्दीतील माणुसकी पाहायला मिळते

अंकिता खाणे (Ankita Khane)

अनेक वेळा आपल्याला वर्दीतील माणुसकी पाहायला मिळते. आपल्याला सतत याचा अनुभव येत असतो. अशीच एक घटना समोर आली आहे. यावेळी पुन्हा एकदा वर्दीतील माणुसकी दिसून आली आहे.

बुधवारी (ता 16) रोजी रात्रीच्या वेळी एक ६२ वर्षीय महिला रुग्णालयात आपल्या पतीला भेटण्यासाठी जात होती. घाईगडबडीत रस्ता ओलांडत असताना या महिलेला लोकमान्य टिळक रोड येथे एका दुचाकीने धडक दिली. या अपघातात त्या जखमी झाल्या.

त्याचवेळी लोकमान्य टिळक रोड येथे कर्तव्यावर असणारे लोकमान्य टिळक रोड मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संदीप वाकचौरे यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता तात्काळ जखमी महिलेस हातात उचलून धावत जवळच असलेल्या जी. टी. रुग्णालयात दाखल केले.

त्यांच्या या सतर्कतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यासंबधीचे ट्विट मुंबई पोलीसांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी संदीप वाकचौरे यांनी त्या महिलेला उचलून ते रुग्णालयाकडे धावताना दिसत आहेत. प्रत्येकाने अशी सतर्कता दाखवणे गरजेचे असल्याचे मुंबई पोलीसांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT