मुंबई

भयानक! नवऱ्याची हत्या करुन बायकोने किचनमध्ये पुरला मृतदेह

प्रियकराच्या मदतीने केला गुन्हा

वैदेही काणेकर

मुंबई: मुंबईत एक भयंकर गुन्हा (crime) उघडकीस आला आहे. विवाहबाह्य संबंधांतून एका २८ वर्षीय महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या (murder) केली व घरातील किचनमध्ये (home kitchen) मृतदेह पुरला. मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहीसरमध्ये (dahisar) ही धक्कादायक घटना घडली आहे. (Woman Kills Husband With Lovers Help & Buries Body in kitchen at dahisar)

रशीदा शेख असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे. तिचा प्रियकर अमित मिश्रा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. हत्येची ही घटना १२ दिवसांपूर्वी घडली. आरोपींनी धारदार हत्याराने मुलांसमोरच पती रईस शेखचा गळा चिरला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

रशीदा आणि अमितने रईसची हत्या केल्यानंतर किचनमध्ये मृतदेह पुरला व नेहमीसारखं जगणं सुरु केलं. रईस एका कपड्यांच्या दुकानात कामाला होता. २५ मे रोजी रईसच्या शेजाऱ्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. कारण आठवड्याभरापासून त्याने रईसला पाहिले नव्हते.

रईसचा भाऊ त्याच्या घरी आला. त्यावेळी पुतण्यांनी काकाला घडला प्रकार सांगितला व हा भयंकर गुन्हा उघडकीस आला. पोलीस सध्या किचनमध्ये दफन केलेला मृतदेह मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT