Physical Abused Allegations on Ganesh Naik e sakal
मुंबई

भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, चौकशीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ऐरोलीचे आमदार व नवी मुंबईचे वजनदार भाजपा नेते गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याबाबत नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी तपास करून दोन दिवसात अहवाल द्यावा, असा आदेश राज्य महिला आयोगाने (State Woman Commission) दिला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

या महिलेने यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तिने पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने या महिलेने आयोगाकडे तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, ''या संबंधातून आपल्याला पंधरा वर्षाचा मुलगाही असल्याचा दावा या महिलेने केला आहे. 1993 पासून नाईक आपले लैंगिक शोषण करत आहेत. त्यांनी लग्नाचे आमिष देऊन तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आपले लैंगिक शोषण केले. भाजप आमदार नाईक यांच्या धमक्यांमुळे आपल्याला त्यांच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये रहावे लागत आहे. आपल्याला वैवाहिक अधिकार मिळावेत तसेच या मुलाकरता पितृत्वाचा अधिकार मिळावा यासाठी या महिलेने नाईक यांच्याकडे सतत तगादा लावला होता. मात्र, त्यावर गणेश नाईक यांनी या महिलेला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तर गणेश नाईक यांचा मुलगा संदीप हा देखील या महिलेला गणेश नाईक यांच्याशी असलेले संबंध सोडून इतरत्र निघून जावे यासाठी या महिलेला व तिच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता'', असा या महिलेचा आरोप आहे.

या महिलेने पोलिसांना लेखी तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही, तसेच या महिलेला व तिच्या मुलाला सुरक्षाही पुरवली नाही. त्यामुळे नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा व आपल्याला पोलिस संरक्षण द्यावे अशी तक्रार या महिलेने राज्य महिला आयोगाकडील अर्जात केली होती. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७६, ४२०, ५०४, व ५०६ नुसार गुन्हा नोंदवावा, अशी तिची मागणी आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली. अध्यक्षांच्या सूचनेनुसार नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी दोन दिवसात याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा असे निर्देशही महिला आयोगाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT