मुंबई

भिवंडीत महिलेवर गोळीबार, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल

शरद भसाळे

भिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील काल्हेर गावात गेल्या आठवड्यात शिवसेना शाखाप्रमुखावर राजकीय वादातून गोळीबार झाल्याची घटना ताजीच असताना, आज सकाळी गावातील एका घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी महिलेवर बेछूट गोळीबार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या हल्ल्यात सदर महिला जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयश्री देडे (38) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे करीत आहेत. 

काल्हेर गावातील जयदुर्गा अपार्टमेंटमध्ये ही घटना आज सकाळी 10 ते 11च्या सुमारास घडली. महिलेचे पती शिवराम हे कामावर आणि मुलगा बाहेर गेला होता. त्यामुळे ही महिला घरी एकटीच होती. सकाळी दोघे अनोळखी व्यक्ती महिलेच्या घरी आले आणि त्यांनी महिलेवर गोळीबार केला. त्याचा आवाज बाहेर उभ्या असलेल्या मुलाने ऐकताच तो आपल्या मित्रासह घरात येत असतानाच जयश्री यांची हल्लेखोरांबरोबर झटापट झाली. यात हल्लेखोरांनी झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी त्यांच्या डोक्‍यास लागली. यावेळी मुलगा व मित्राने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ढकलून हल्लेखोर पसार झाले. 

जयश्री यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थीर आहे. गोळीबारीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण, एसीपी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार नेमका राजकीय वादातून अथवा कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्यानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. 
Woman shot dead in Bhiwandi admitted to private hospital for treatment

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

Thane News: 27 गावं तरी स्वतंत्र नगर परिषद नाही, आमदार-खासदार आक्रमक; कल्याण शीळ रोडवर सर्वपक्षीय आंदोलन

Latest Marathi News Live Update : पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Mumbai Happiest City: कधीच न झोपणारी मुंबई ठरली ‘हॅप्पिएस्ट सिटी’! आनंदी शहरांच्या यादीत मिळाला पाचवा क्रमांक

Dhananjay Munde: राज्यातल्या बड्या नेत्यांच्या गाड्यांमध्ये धनंजय मुंडेंनी मोबाईल लपवले? आरोपांवर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT