Train
Train sakal
मुंबई

देव तारी त्याला... अख्खी ट्रेन वरून गेली पण बचावली महिला!

विराज भागवत

बदलापूर स्टेशनवर घडला अंगावर काटा आणणारा प्रकार

मुंबई: मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी चित्तथरारक घटना घडली. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या 35 वर्षांच्या एका महिलेने बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळावर झोपून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, मुंबईहून निघालेली उद्यान एक्सप्रेस त्या महिलेच्या अंगावरुन जाऊनही त्या महिलेला कोणतीच इजा झाली नसल्याची आश्चर्यकाराक बाब दिसून आली. श्रृती विशाल मालवे असं महिलेचं नाव असून ती मानसिक रूग्ण असल्याचीही माहिती आहे. (Woman survives unhurt after train passes over her at badlapur local train)

श्रृती मालवे ही महिला कुटुंबीयांना न सांगता गुरुवारी घरातून निघून गेली. त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात 200 मीटर अंतरावर श्रृती रेल्वे रुळावर झोपली होती. नशीब बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले. श्रृती मालवे यांच्या आई प्रमिला अनिल शिंदे यांनी दिलेली माहितीनुसार, श्रृती तिच्या कु़टुंबीयांसोबत मालाड येथे राहते. तिचा नवरा तिच्यासोबत कधीतरीच राहतो. श्रृतीचा पती त्यांचा दोन मुलांना घेऊन बुधवारी रात्री त्याच्या पालकांच्या घरी रवाना झाला. त्यानंतर श्रृतीसोबत तिचा 8 वर्षांचा मुलगाच होता. तिला मानसिक आजारही आहे. तिच्यावर उपचारही सुरु आहेत. तिला उपचारासाठी देण्यात आलेल्या टॅबलेट्स खायला ती जेव्हा विसरते तेव्हा श्रृती मनोरूग्णासारखं वागते.

बुधवारी रात्री तिला गोळ्या खायचा विसर झाला. त्यानंतर गुरुवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास श्रृतीने घर सोडले. त्यानंतर श्रृती तिच्या पालकांच्या घरी गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोहोचली. परंतु, काही वेळानंतर ती तिच्या कुटुबीयांना काहीही न सांगता घरातून बाहेर गेली. आम्ही सर्वांनी श्रृतीचा सर्वच ठिकाणी शोध घेतला. बदलापूर स्थानकाजवळही शोधशोध केली, मात्र तिचा ठावठिकाणा कुठेही लागला नाही. दरम्यान, श्रृती बदलापूर रेल्वे स्थानकाच्या रुळावर सापडली असल्याचे आम्हाला कळले.

कल्याणचे वरिष्ठ रेल्वे पोलिस निरिक्षक शार्दूल वाल्मिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रृती बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातील 200 मीटर अंतरावर रेल्वे रुळाच्या मध्यभागी सकाळी 9.25 वाजताच्या सुमारास सापडली. उद्यान एक्सप्रेसच्या चालकाने अंतिमक्षणी श्रृती रेल्वे रुळावर झोपली असल्याने अचानक ब्रेक्स दाबले तरीही तिच्या अंगावरुन एक्सप्रेस धडधडत पुढे निघाली. तातडीने उद्यान एक्सप्रेसच्या चालकाने या घटनेविषयी रेल्वे स्टेशन मास्टर यांना माहिती दिली. त्यानंतर रेल्वेच्या RPF आणि GRP पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली. तातडीने पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत श्रृतीला शोधले आणि तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची रेल्वे पालिसांनी नोंद करुन श्रृतीला घरी सोडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT