Priti-Durve
Priti-Durve 
मुंबई

निवडणूक कामामुळे महिलेचा मृत्यू

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - कावीळ झालेली असतानाही निवडणूक कामासाठी उपस्थित राहिलेल्या प्रीती दुर्वे (वय ३१) या सांस्कृतिक खात्यातील महिला कर्मचाऱ्याचा शनिवारी (ता. ११) मृत्यू झाला. प्रीती या मूळच्या नागपूरमधील रहिवासी होत्या. त्यांना दीड वर्षाची दोन जुळी मुले आहेत.

इच्छा नसतानाही तब्बल १,८०० कर्मचाऱ्यांना निवडणूक कामावर रुजू व्हावे लागले होते. त्यापैकीच एक प्रीती दुर्वे. मुंबईत २९ एप्रिलला मतदान झाले. त्याचदिवशी त्यांचे डोळे काविळीमुळे पिवळे झाले होते. अशक्तपणा जाणवत होता; मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीचे काम टाळता येणार नाही, असे आदेश निघालेले असल्याने प्रीती शिवडीतील मतदान केंद्रावर हजर होत्या.

मतदान प्रक्रिया सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे १० दिवस शर्थीचे प्रयत्न झाल्यानंतरही प्रीती यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर, शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मतदानाच्या दिवशी धारावीतील मतदान केंद्रावर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. कर्मचाऱ्यांनी अर्ज करून आजारी असल्याचे कळवले, तर त्यांना निवडणूक कामातून सूट दिली जाईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली; मात्र ती कर्मचारी संघटनांना अमान्य आहे. कामातून सूट मागणारा अर्ज केला तर कारवाई करू, असे फर्मानच प्रशासनाने काढल्याने दुर्वे किंवा अन्य कुणीही अर्ज करण्याचा प्रश्‍नच नव्हता, असे संघटनेचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT