मुंबई

Women's Day Special: महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्र

मिलिंद तांबे

मुंबई: महिला दिनानिमित्त फक्त महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात 189 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी पाच विशेष लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत.  त्याठिकाणी फक्त महिलांसाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात अशी एकूण 189 महिला विशेष केंद्र सुरू असून त्यातील सर्वाधिक 19 केंद्र ही ठाणे जिल्ह्यात आहेत.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी लाभार्थींची गर्दी होत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक तसेच दीर्घकालीन आजार असणाऱ्या लाभार्थींना लस देण्यात येत असल्याने त्याची ही संख्या अधिक आहे. यात महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला.

------------------

(संपादन- पूजा विचारे)

Womens Day state government decided corona vaccination centersfor women only

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT