नेरूळमधील वंडर्स पार्क अंधारात 
मुंबई

नेरूळमधील वंडर्स पार्क अंधारात

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : शहरातील सर्वात मोठे उद्यान म्हणून ख्याती असलेल्या वंडर्स पार्कमधील अपुऱ्या प्रकाशामुळे लहान मुले व पालकांचाही हिरमोड होत आहे. संध्याकाळनंतर या उद्यानातील मंद प्रकाश व्यवस्थेमुळे पालकांना मोबाईल टॉर्चचा वापर करत फिरस्ती करावी लागत आहे.

नेरूळ येथील वंडर्स पार्कला नवी मुंबईतूनच नाही तर खारघर, पनवेलसह मुंबई, ठाणे परिसरातील नागरिकही सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भेट देतात. प्रवेश शुल्क म्हणून प्रौढांसाठी ३५ रुपये, तर लहान मुलांसाठी २५ रुपये तिकीट आकारले जाते. सध्या टॉय ट्रेन व इतर राईड्‌स बंद असल्या तरी लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र, या ठिकाणी संध्याकाळनंतर आपल्या मुलांना घेऊन येणाऱ्या पालकांचा भ्रमनिरास होत आहे. 

याबाबत येथे नियमित येणाऱ्या पलक शर्मा यांनी सांगितले की, संध्याकाळनंतर येथे अपुरी प्रकाश व्यवस्था असते. ती पालिकेने बदलायला हवी. चांगला प्रकाश असल्यास मुलांनाही व्यवस्थित खेळता येईल. तर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता तानाजी शिंदे यांनी याबाबत बोलताना सांगितले आहे की, अतिरिक्त विद्युत पुरवठा करण्यासाठी उद्यान विभागाने विद्युत विभागाला पत्र देणे गरजेचे आहे. त्यानंतर याबाबत कार्यवाही करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT