Aryan Khan Sakal
मुंबई

'डॅड मी आर्यनला तुरुंगात एकटं सोडणार नाही'

"त्याचे शब्द माझ्या मनाला इतके स्पर्शून गेले की, त्याच्यासाठी मैत्री सर्वोच्च आहे"

दीनानाथ परब

मुंबई: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला NCB ने कॉर्डेलिया क्रूझमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर (rave party) छापा मारुन स्टार कीड आर्यन खानसह (aryan khan) आठ जणांना ताब्यात घेतलं. दुसऱ्या दिवशी आर्यनसह त्याचे मित्र अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धामेचा या तिघांना अटक केली. तिन्ही आरोपी सध्या तुरुंगात असून जामिनाच्या प्रतिक्षेत आहेत. तुरुंगात असलेल्या अरबाजला सध्या मित्र आर्यनची जास्त काळजी वाटत आहे, असे अस्लम मर्चंट यांनी सांगितले. ते अरबाजचे वडिल आहेत.

'सुनावणी आधी निर्दोष मुलांना शिक्षा देऊ नये', असे अस्लम यांनी एका आघाडीच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मी भेटून निघत असताना अरबाज मला म्हणाला की, "डॅड मी आर्यनला तुरुंगात एकटं सोडणार नाही. आर्यनला काहीही होऊ देणार नाही. आम्ही एकत्र इथे आलो आहोत. एकत्रच इथून बाहेर निघणार" "त्याचे शब्द माझ्या मनाला इतके स्पर्शून गेले की, त्याच्यासाठी मैत्री सर्वोच्च आहे" असे अस्लम मर्चंट म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आर्यन खानच्या जामिन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालय निकाल देऊ शकते. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलेले नाहीत. WhatsApp चॅटच्या आधारे तो ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचा दावा एनसीबीने केला आहे. आर्यन खानच्या अटकेला आता तीन आठड्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी मविआत बिघाडी? राज तर सोडा, उद्धव सोबतही आघाडी नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

PAK vs SA 2nd Test: तरुणांनी माती खाल्ली, तिथे 'वयस्कर' खेळाडूने पाकिस्तानची लाज वाचवली! मोडला ९२ वर्षांपूर्वीचा विक्रम, पण...

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान जमीन खचली; पोलिसांनी असं काही केलं की...

Latest Marathi News Live Update : नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणाविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक

IND vs AUS 2nd ODI: रोहित निघून जाताच, गंभीर- आगरकरची Yashasvi Jaiswal सोबत चर्चा; उद्या खेळणार का? कोच म्हणाले...

SCROLL FOR NEXT