मुंबई

मुंबईतील शिक्षकांना आजपासून ‘वर्क फ्रॉम होम’, अशी केली जाणार कामाची नोंद

संजीव भागवत

मुंबई: मुंबई आणि परिसरात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यासाठी खबरदारीचा इशारा म्हणून मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना आजपासून ‘वर्क फ्रॉम होम’करण्याचे आदेश दिले आहेत. 

गेल्या दोन महिन्यात मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता.  त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेत मुंबईत शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती 50 टक्के करण्यात आली होती. मात्र पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने शिक्षकांना शाळांमध्ये बोलावले जाऊ नये अशी मागणी नुकतीच शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या ही अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी याचे हित लक्षात घेत शिक्षकांना पुढील आदेश जारी होईपर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी आदेश जारी केले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकांनी घरी राहून ई-लर्निंग शैक्षणिक सुविधेनुसार आणि ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करावे, घरातून काम करताना शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी आपल्या दैनंदिन कामाची गुगल शीट किंवा वर्कशीटमध्ये नोंदी कराव्यात असे आदेश एका परिपत्रकातून दिले आहेत.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्याचे वितरण करण्यासाठी शिक्षकांची शाळेमध्ये उपस्थिती आवश्यक असल्यास त्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलवू नये, ज्या वेळी आवश्यक असेल अशा दिवशी शिक्षकांना शाळेत बोलावले जावे, मात्र त्यासाठी महत्वाचे कारण असावे, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Work from home for Mumbai teachers from today Daily work recorded Google Sheet

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

Railway Ticket Booking: 'रेलवन' ॲपचा ‘डिजिटल’ गोंधळ! पैसे वजा होऊनही तिकीट गायब; अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण...

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT