horse 
मुंबई

माथेरानमध्ये 'त्यांच्या'वर आली उपासमारीची वेळ, 'हे' पाहा लॉकडाऊनमुळे साईड इफेक्टस...

हेमंत देशमुख

कर्जत : लॉकडाऊनचा फटका बहुतांश व्यवसायाला बसला आहे. याचप्रमाणे माथेरानमध्येही पर्यटन बंद असल्याने पर्यटकांना स्थळांवर फिरायला नेणाऱ्या घोडेस्वारांचाही चार महिन्यांपासून धंदा बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या घोडेस्वारांना पर्यटन सुरू होवोस्तर शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कर्जत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे केली आहे. कर्जत वंचित बहुजन आघाडीने याबाबत मुख्यमंत्र्यांकडे कर्जत तहसील कार्यालयामार्फत निवेदन देऊन केली आहे.

थंड हवेचे ठिकाण तसेच पर्यटनस्थळ म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. लाॅकडाऊन जाहीर झाल्यामुळे देशभरातील अनेक पर्यटनस्थळे बंद झाली. माथेरानमध्येही कोरोना, लाॅकडाऊनमुळे पर्यटक येणे बंद झाले. त्यामुळे माथेरानमधील पर्यटनावर अवलंबून असलेले सर्व व्यवसाय बंद झाले आहेत.

याचा सर्वात मोठा फटका घोडेवाल्यांना बसला आहे. घोड्यांना लागणारे खाद्यसुद्धा उपलब्ध करायचे आहे. यामुळे घोडेवाल्यांची परिस्थिती बिकट होऊन बसली आहे. त्यांच्यावर उपासमारीची परिस्थिती तयार झाली आहे. निवेदनामार्फत शासनाकडे मागणी करण्यात आली आहे की, माथेरानमध्ये पर्यटक सुरू होईपर्यंत घोडेवाल्यांना आर्थिक मदत करावी. निवेदन देतेवेळी कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, जिल्हा पदधिकारी सुनिल गायकवाड, शहर सचिव लोकेश यादव उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT