मुंबई

दहिसर मीरा रोड रेल्वे स्थानकांदरम्यानच्या, रेल्वे रुळांवर लोखंडी तुळया टाकण्याचे काम पूर्ण

तेजस वाघमारे


मुंबई : एमएमआरडीए मार्फत राबविण्यात येत असलेल्या दहिसर पूर्व ते डी एन नगर या मेट्रो लाईन 2अ प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातील सर्वात कठीण टप्पा पश्चिम रेल्वे मार्गावरील दहिसर आणि मीरा रोड या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळांवर लोखंडी तुळया उभारण्याचे काम एमएमआरडीएने रविवारी (ता.27) पहाटे यशस्वीपणे पार पाडले आहे.

 20 ते 22 सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील सारा भाग चिखलमय झाला होता. त्यामुळे हा भूभाग पोकळ राहू नये म्हणून येथे जाड आणि बारीक खडीचे मिश्रणाचा भराव टाकण्यात आला आणि ही क्रेनचे वजन पेलण्यास सक्षम करण्यात आली. आधी प्रत्येकी 36 टन वजनाच्या तीन पैकी दोन, एकूण 72 टन वजनाच्या तुळया उभारायच्या होत्या. तथापि हे काम केवळ 45 मिनिटांत पूर्ण झाले. म्हणून साडेतीन तासांचा योग्य वापर करून तिसरी तुळईही सुरक्षितपणे योग्यपणे उभारण्यात आली. या तुळयांचे एकूण वजन 110 मेट्रिक टन आहे. या तुळया हैदराबादमधील फॅब्रिकेशन यार्डमध्ये प्रीसीशन कटिंग, होल पांचिंग आणि वेल्डिंग मशीनच्या सहाय्याने बनवण्यात आल्या.

यासाठी ऑटोमॅटिक बीम वेल्डिंग मशीन, कॉम्प्युटर न्यूमरिक कंट्रोल ड्रीलिंग, कटिंग मशीन यांचा वापर करण्यात आला. गंज लागू नये म्हणून तुळयांच्या साऱ्या भागांना आरडीएसवो निकषांप्रमाणे धातूक्रिया करून अल्युमिनियम पेंटिंग करण्यात आले. हे काम मध्यरात्रीच्या 12.5 पासून पहाटे 3.35 वाजेपर्यंत रहदारी आणि वीजपुरवठा बंद ठेऊन 500 मेट्रिक टन आणि 300 मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेन वापरून आणि आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्यासाठी 400 मेट्रिक टन क्षमतेची एक अतिरिक्त क्रेन यांच्या साहाय्याने करण्यात आले.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT