Sandip Gaikwad sakal
मुंबई

Ulhasnagar News : कामगारांच्या लढ्यासाठी नेत्याचा अर्धनग्न आंदोलनाचा लढा

कामगार संघटनेचे सर्वेसर्वा नेते संदीप गायकवाड यांनी कामगारांच्या लढ्यासाठी चक्क उल्हासनगर पालिकेतच मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या दालनात अर्धनग्न आंदोलनाचा लढा लढला.

दिनेश गोगी

उल्हासनगर - महानगरपालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका दिलेल्या कोणार्क या एन्व्हायरो ठेकेदाराकडून गेल्या 10 वर्षांपासून कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार बंधनकारक असलेल्या पगाराचे शोषण करत आहे. असा आरोप करणाऱ्या लढा या कामगार संघटनेचे सर्वेसर्वा नेते संदीप गायकवाड यांनी कामगारांच्या लढ्यासाठी चक्क उल्हासनगर पालिकेतच मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या दालनात अर्धनग्न आंदोलनाचा लढा लढला. विशेष म्हणजे गायकवाड हे शिंदे गटाचे शिवसेनेचे उपशहरप्रमुख देखील आहेत.

मागील दहा वर्षापासून पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम हे कोणार्क एन्व्हायरो या कंपनीकडे आहे. यासाठी महापालिका कोणार्क एन्व्हायरो कंपनीला दिवसाला तब्बल साडे आठ लाख रुपये देते. यामध्ये घराघरातून कचरा जमा करून तो डम्पिंग ग्राउंड पर्यंत पोहोचवणे तसेच तिथेच नष्ट करून शून्य कचरा मोहीम राबवणे यासाठी ही रक्कम दिली जाते.

तसेच प्रभाग समिती तीन मध्ये रस्त्याचे साफसफाई व इतर कामांसाठी कोणार्क कंपनीचे 270 कंत्राटी कामगार कार्यरत आहेत.असे एकूण साडे आठशेपेक्षा अधिक कामगारांचे प्रति महिना पाच ते आठ हजार रुपयांचे आर्थिक शोषण कोणार्क कंपनी प्रशासनामार्फत केले जात असल्याचा आरोप लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी केला आहे.

संदीप गायकवाड यांनी कोणार्क एन्व्हायरो, पालिका प्रशासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.सुनावणी अंती 26 सप्टेंबर 2023 ला साहेब कामगार आयुक्त अ. वि. क्षिरसागर यांनी किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना पगार मिळावा असे आदेश पालिका आयुक्त अजिज शेख यांना दिले होते.

मात्र त्यानंतरही अद्यापही कोणार्कच्या सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळत नसल्याने लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी मागच्या आठवड्यात पालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण केले होते.हे उपोषण संपवताना बुधवारी आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित केले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र संदीप गायकवाड हे आज पालिकेत बैठकीला आले असता मालिका आयुक्त अजिज शेख तसेच कोणार्क कंपनीचे प्रशासकीय अधिकारी हे अनुपस्थित दिसले.

याबाबत जाब विचारण्यासाठी संदीप गायकवाड हे उपायुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे यांच्या दालनात गेले असता त्यांना समाधानकारक उत्तरे देण्यात येत नसल्याने संदीप गायकवाड यांनी जमिनीवर बसून अर्धनग्न आंदोलन सुरू केले.

त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव आणि मनीष हिवरे यांनी गायकवाड यांच्याशी चर्चा करून लवकरच पुन्हा बैठक बोलावली जाईल असे आश्वासन दिल्यावर गायकवाड यांनी आंदोलन मागे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT