मुंबई

आम्हाला गावी जायचंय! मुंबईतील चाकरमानी लॉकडाऊन संपण्याच्या प्रतिक्षेत

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी मुंबई :  देशभरात लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर मुंबईतील लाखाे चाकरमान्यांना गावाकडचे वेध लागले आहेत. सध्या जिथे आहात तिथेच सुरक्षित राहा असे आवाहन केले जात असले तरी लोकांचा गावी जाण्याचा अट्टाहास मात्र कायम आहे. 
शहराच्या तुलनेत गाव सुरक्षित वाटत असल्याने तसेच तेथे आपल्या माणसांच्या सान्निध्यात वेळ घालवणेही सुकर होईल, असे वाटत असल्याने चाकरमान्यांनी लॉकडाऊन संपताच गाव गाठण्याची तयारी सुरू केली आहे.

राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत जाहीर केलेला लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत वाढवला आणि नागरिकांनी मिळेल ती गाडी पकडून गाव गाठण्यास सुरुवात केली. हातावर पोट असणाऱ्यांनी तर चालतच गावचा रस्ता धरला. शहरात वेगाने वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना आपले गाव सुरक्षित वाटू लागले आहे. त्यामुळे संचारबंदी उठली की गावी जाण्यासाठी उपलब्ध मार्ग, पर्यायांचा विचार केला जात आहे.
याविषयी नेरुळमधील एका रहिवाशाने सांगितले की, संचारबंदी पूर्णतः उठेल असे वाटत नाही. काही दिवसांनी पुन्हा आदेश जारी केले जातील. त्यापूर्वी गाव गाठायचे आहे. गावी रानातल्या घरात कोणाशीही संपर्कात न येता राहता येईल. घरातील आपली माणसं जवळ असल्याने वेळही जाईल. इथे शहरातल्या घरात, चार भिंतीत घुसमटल्यासारखे होते. लहान मुलांचीही चिडचिड होत आहे. भावंडांमध्ये त्यांचाही जीव रमेल.

गाव आमचे चांगले
एरव्ही शहरांकडे आकर्षित हाेणारे चाकरमानी गावच चांगले असल्याचे सांगत आहेत. 
एकदाचे गाव गाठल्यानंतर पुढे लॉकडाऊन आणखी काही महिन्यांसाठी जाहीर केला तरी कसलीच चिंता नसल्याचा विचार काही कुटुंबीय करत आहेत.

गावात प्रवेशबंदी 
गावी प्रवेशबंदी केली तरी शेतावर, माळावर अनेकांची घरे आहेत. फार्महाऊस आहेत, तिथे राहण्याची सोय होऊ शकते, असे काहींचे म्हणणे आहे. अनेकांच्या नातेवाईकांनी आधीच गाव गाठले आहे. त्यांच्याकडूनही वारंवार गावी येण्याबाबत निरोप येत असल्याचे, सांगितले जात आहे.

workers Waiting for the end of the lockdown 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ‘एकाही देशद्रोह्याला सोडणार नाही’, राहुल गांधी यांच्या टार्गेटवर कोण? सोशल मीडिया पोस्टने खळबळ

IND vs WI: अरे भारीच...! बॉल नीट दिसला नाही, तरी ईशान किशनने बाऊंड्रीजवळ घेतला अफालूनत कॅच, Video एकदा पाहाच

Maharashtra Weather : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा मात्र 'या' चार जिल्ह्यांत पाऊस धोधो कोसळणार; तुमच्या भागात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Pune CNG Price Hike : पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी शंभरी पार; आज रात्रीपासून नवा दर लागू

IND vs WI, T20I: श्रेयस अय्यरचे विक्रमी शतक! रोहित-सूर्यालाही जे जमलं नव्हतं, ते करून दाखवलंय

SCROLL FOR NEXT