पर्यावरण आणि स्वच्छतेचा जागर sakal
मुंबई

World Environment Day : तरुणाई करणार पर्यावरण आणि स्वच्छतेचा जागर

जून ७ ते १३ राज्यभर विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जून ५, २०२२ पर्यावरण जागृतीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे पहिल्यांदाच तरुणांच्या सहभागाने "पर्यावरण जागृती आणि स्वच्छता सप्ताहा”ची सुरुवात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे जून ७ पासून करणार आहेत. मंत्री महोदय आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जून ७ ला सकाळी ८ वाजता वरळी किल्ल्यावरून ही मोहीम सुरू होईल आणि जून १३ पर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये ही राबवली जाईल.

आयआयटी बॉम्बेने सर्वप्रमथम या मोहीमेमध्ये सहभाग नोंदवला असून रविवारी सकाळी विद्यार्थ्यांनी पवई लेक परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. आयआयटी बॉम्बे अभ्युदय टीमच्या ४०० हून अधिक विद्यार्थ्यांकडून दोन किलोमीटर लांबीचा हा परिसर येत्या आठवड्यामध्ये स्वच्छ करण्यात येणार असून आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सोफिया कॉलेज फॉर वुमनही या मोहिमेत भाग घेत आहेत.

माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत आणि राष्ट्रीय समाज सेवा (एनएसएस) आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने राज्यभरातील युवक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होणार आहेत. एनएसएस युनिट्सने त्यांच्या परिसरातील शैक्षणिक संस्था, किल्ले, विहिरी, नदीचे पात्र, तलाव, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे, शासकीय रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, बस डेपो, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. तसेच पथनाट्य, जनजागृतीपर कार्यक्रमही होणार आहेत. "हवामान बदल" आणि "स्वच्छता" या विषयाच्या अनुषंगाने गाव, शहर स्वच्छ ठेवणे, पर्यावरणाची काळजी घेणे, घनकचरा व्यवस्थापन, झाडे लावणे, प्लॅस्टिकमुक्त भारत इत्यादींचे महत्त्व सांगणे, असे काही उपक्रम होतील. सर्व महाविद्यालयांना "ग्रीन क्लब" स्थापन करण्यास सांगितले असून वृक्षारोपण यासारखे उपक्रम आणि विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातील.

उपक्रमांना प्रोत्साहन देताना, माझी वसुंधरा कार्यक्रमाचे मिशन डायरेक्टर, सुधाकर बोबडे म्हणाले, “हवामान बदलाचे परिणाम गंभीर असून महिला आणि तरुणांवर त्याचा प्रभाव जास्त आहे. या उपक्रमामुळे तरुणांना आणि मुलांना हवामान बदलाच्या परिणामांविषयी बोलण्याची, ते समजून घेण्याची आणि त्यावर कृती करण्याची संधी मिळणार आहे. हे उपक्रम माझी वसुंधरा येथील पंचमहाभूतांवर (भूमी, वायु, जल, अग्नी आणि आकाश) लक्ष केंद्रित करतील आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात तरुणांच्या क्षमता वाढीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतील.”

युसूफ कबीर वॉटर, सॅनिटेशन, हायजीन (वॉश) स्पेशलिस्ट आणि फोकल पॉइंट फॉर सीसीईएस, डीआरआर आणि इमर्जन्सी, युनिसेफ फील्ड ऑफिस फॉर महाराष्ट्र यांनी कार्यक्रमांमध्ये युवकांना सहभागी करून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “हवामान बदल हे बालहक्कांसाठी संकट आहे कारण मुले कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न करता त्याचे परिणाम सहन करतात. हे विचारात घेऊन, युनिसेफ मुंबईने युवा कार्यकर्त्यांसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण विकसित केले असून त्यासाठीची सुविधा आणि तरुणांची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने युवा कार्यकर्त्यांना सहाय्य देण्यासाठी सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) पुणे, युवा गट, नेहरू युवा केंद्र यांच्याशी हातमिळवणी केली आहे. जागृती, प्रशिक्षण आदीच्या माध्यमातून राज्यात हवामान बदलांवर बोलणारे, त्यासाठी काम करणारे युवा गट तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे कबीर यांनी सांगितले.

“एनएसएस राज्यभरातील स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करणार असून ‘हरित आणि स्वच्छ महाराष्ट्र’ या विषयावर विविध उपक्रम राबवले जातील. वृक्षारोपण व संवर्धन मोहीमेचाही त्यात समावेश असेल. आम्हाला या मोहिमेद्वारे पर्यावरण जागृतीचे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि ते अंमलात आणायचे आहेत,” डॉ. प्रशांतकुमार वनाजे, राज्य संपर्क अधिकारी, एनएसएस यांनी सांगितले.

उत्कर्षा कवडी, संचालक, सचिवालय, महाराष्ट्र अर्बन वॉश अँड एन्व्हायर्नमेंटल सॅनिटेशन कोलिशन (महा-यूडब्ल्यूईएस-सी) म्हणाल्या, “पर्यावरण समस्यांच्या जागतिक परिणामांना सामोरे जाण्यासाठी स्थानिक उपाय महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. या उद्देशाने, महाराष्ट्र अर्बन वॉश आणि एन्व्हायर्नमेंटल सॅनिटेशन कोएलिशन, सरकारी योजना आणि मिशनअंतर्गत विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना तसेच इतर विकास संस्थांना पाठिंबा देण्यासाठी काम करतात. राज्याच्या या मोहीमेमध्ये महा-यूडब्ल्यूईएस-सीचा संपूर्ण सहभाग असेल.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT