मुंबई

World Hepatitis Day! भारतात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मृत्यू काविळमुळे...

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा


मुंबई : भारतात सर्वाधिक मृत्यू होण्यामध्ये कावीळ या आजाराचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे हा आजार भारतात आजही चिंतेचा विषय आहे. ‘हेपेटायटीस’ म्हणून ओळखला जाणारा हा यकृताचा एक विकार आहे. यात यकृताला सूज येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माहितीनूसार, सध्या जगभरात 3 कोटी 25 लाख दशलक्ष लोक हेपेटायटीस बी आणि सी या विकाराने पिडित आहेत. चिंताजनक म्हणजे यातील फक्त 10 ते 20 टक्के लोकांना या आजाराबद्दल पुरेशी माहिती आहे. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी  28 जुलै जागतिक हिपॅटायटिस डे म्हणून पाळला जातो.

हेपेटायटीस ए, बी, सी आणि ई या विषाणूंच्या संसर्गामुळे काविळ होतो. हेपेटायटीस ए आणि ई संसर्ग कमी काळ टिकतो. तसंच, ‘हेपेटायटीस’ बी आणि सी विषाणूंचा संसर्ग झाल्यास तो अधिक वर्ष तग धरून राहू शकतो. या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काविळला सायलेंट किलरही म्हटले जातं.
दुषित पाणी, अन्न आणि संक्रमित व्यक्तीच्या रक्त किंवा शरीरातील द्रव्य पदार्थाच्या संपर्काद्वारे हा आजार पसरतो. दूषित पाण्यामुळे पसरणारा हिपॅटायटिस ई विषाणूची लागण भारतीयांना अधिक होत असल्याच सांगितले जाते. गरोदरपणात याचा धोक अधिक असतो. त्यामुळे यकृतही निष्क्रीय होऊ शकते.  हिपॅटायटिस बी आणि सी हा दुषित रक्त आणि शरीरातील द्रव्याच्या संपर्कात आल्याने होतो. हे सायलेंट विषाणू असतात. त्यामुळे त्यांच्यामुळे यकृताला झालेली इजा दूर्लक्षित केली जाऊ शकते.

सध्या हिपॅटायटिस बी आणि सी वरील उपचारासाठी चांगले अँटीव्हायरल औषध उपलब्ध आहेत. 95% हिपॅटायटिस सी रुग्णांमधील आजार बरा करता येतो. तर, हिपॅटायटिस बी मधील गुंतागुंत थांबवून त्याचे प्रमाण नियंत्रित करता येते. हिपॅटायटिस बीच्या सर्वच रुग्णांना उपचारांची गरज पडत नाही. त्यामुळे नियमित तपासणी आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. 

स्वतःचा बचाव कसा कराल ?
पौष्टिक आहाराचे सेवन आणि शुद्ध पाणी प्यावे
शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी असल्याची खात्री करून घ्या
हेपेटायटीस ए या आजारावर लस उपलब्ध असून वयाच्या 1 वर्षांनंतर ही लस कोणीही घेऊ शकतो
हेपेटायटीस बी आणि सी संसर्ग होऊ नये म्हणून असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत
हेपेटायटीस बीसाठी लस उपलब्ध असून जन्मानंतर ती बाळाला द्यावी लागते.
काविळची लागण झाल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा

चाचणी करून घ्या
नियमित आरोग्य चाचणीत हेपेटायटीस बी आणि सी संसर्गाची लागण झाली आहे का, याचीही तपासणी करा, असा ग्लोबल रूग्णालयातील सल्लागार बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपेटालॉजिस्ट डॉ. विभोर बोरकर यांनी दिला आहे.

हिपॅटायटिस ए, बी आणि ई मुळे यकृत अचानक बिघडते. त्या रुग्णांना समर्पित यकृत आयसीयू युनिटमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, आपत्कालीन यकृत प्रत्यारोपण करावे लागते. प्रतिबंध म्हणून हिपॅटायटिस ए आणि बीसाठी लस उपलब्ध आहे. त्याद्वारे आपण आजारांचे दुष्परिणाम आणि त्यातील गुंतागुंत रोखू शकतो. हिपॅटायटिस ई आणि सीसाठी ही लस विकसित होत आहे.
डाॅ. पवन हंचनाळे, ज्युपिटर रुग्णालय, गॅस्ट्रोटेरॉलॉजिस्ट

--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT