Worli 30 hours water supply cut Mumbai news kgm00 
मुंबई

मुंबईकरांसाठी मोठी बातमी; 'या' भागात ३० तास पाणी पुरवठा बंद

पूर्व आणि पश्‍चिम मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लोअर परळमधील सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात सोमवारी (ता. १४) १४५० मिलिमीटर व्यासाच्या तानसा पूर्व आणि पश्‍चिम मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता सुरू होणारे काम १५ मार्चच्या दुपारी २ पर्यंत चालणार आहे. परिणामी या काळात जी दक्षिण व जी उत्तर विभागांतील काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही. काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.(Mumbai Water Supply news)

जी/दक्षिण विभाग : डिलाईल रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग. १४ मार्च पाणीपुरवठा हाेणार नाही.

जी/उत्तर विभाग : संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेना भवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभाग विभागांत १४ मार्च रोजी पाणीपुरवठा होणार नाही.

जी/दक्षिण विभाग : ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग आदी विभागांत १५ मार्च रोजी पाणी येणार नाही

जी/दक्षिण विभाग : धोबीघाट-सातरस्ता विभागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

Marathi News Live Updates : मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Mumbai Metro: गणेशोत्सवात मुंबई मेट्रोची स्पेशल सर्व्हिस! मध्यरात्रीपर्यंत विशेष सेवा, शेवटची ट्रेन कधी धावणार?

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

SCROLL FOR NEXT