worli depot sakal media
मुंबई

वरळी डेपोचे विद्युतीकरण पूर्ण; बेस्‍टच्या हरित गतीशीलता प्रवासाला चालना

विद्युतीकरण करण्‍यात आलेला मुंबईतील चौथा डेपो

मिलिंद तांबे

मुंबई : वरळी डेपोचे (worli depot) विद्युतीकरण (electrification) पूर्ण झाले असून यामुळे बेस्‍टच्‍या हरित गतीशीलता प्रवासाला (BEST Journey) चालना मिळणार आहे. बॅकबे, मालवणी व शिवाजी नगर डेपोनंतर वरळी हे विद्युत वाहन चार्जिंग पायाभूत सुविधा असलेला मुंबईतील चौथा डेपो (Mumbai fourth depot) ठरला आहे. मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी ई-बसेसना झेंडा दाखवून उदघाटन केले.

टाटा मोटर्सच्या माध्यमातून वरळी बेस्‍ट डेपो येथे परिपूर्ण वेईकल चार्जिंग पायाभूत सुविधेच्‍या इन्‍स्‍टॉलेशन करण्यात आले.यामुळे आता बॅकबे, मालवणी व शिवाजी नगर आणि आता वरळी डेपोतील विद्युतीकरणामुळे इलेक्ट्रिक बसेससाठी व्‍यापक सुविधा निर्माण झाली आहे.आम्‍हाला वरळी डेपोमधून इलेक्ट्रिक बसेसच्‍या कार्यसंचालनांचा शुभारंभ करण्‍याचा आनंद होत आहे असे बेस्‍ट महा-व्‍यवस्‍थापक लोकेश चंद्रा म्‍हणाले. मुंबईतील चौथ्‍या डेपोच्‍या विद्युतीकरणामुळे पर्यावरणास अनुकूल इलेक्ट्रिक बसेसची पोहोच अधिक वाढेल आणि प्रवाशांच्‍या फायद्यासाठी नवीन मार्ग देखील निर्माण होतील. बेस्‍ट नेहमीच आपल्‍या ताफ्याचे विद्युतीकरण करण्‍याशी कटिबद्ध आहे असे ही त्यांनी पुढे सांगितले.

पर्यायी इंधनासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान देण्‍यामध्‍ये टाटा मोटर्स अग्रस्‍थानी राहिली आहे. तसेच भारतामध्‍ये इलेक्ट्रिक बसेसची अग्रणी उत्‍पादक राहिली आहे. आम्‍हाला इलेक्ट्रिक बसेसच्‍या पुरवठ्यासोबत परिपूर्ण चार्जिंग पायाभूत सुविधेची अंमलबजावणी, मेन्‍टेनन्‍स व कार्यसंचालन सुरू करण्‍यासाठी बेस्‍टसोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो असे  टाटा मोटर्सचे प्रॉडक्‍ट लाइन - बसेसचे उपाध्‍यक्ष रोहित श्रीवास्‍तव म्‍हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT