Cylinder explosion  sakal media
मुंबई

Worli Cylinder Explosion : जखमी झालेल्या चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू

भाग्यश्री भुवड

मुंबई : वरळी (worli) येथे काल मंगळवारी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas cylinder explosion) झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी (four people injured) झाले. त्यापैकी एक चार महिन्याचे बाळ (children) होते. या कुटुंबाच्या उपचाराला नायर रुग्णालयात (Nait hospital) उशीर झाल्याने या प्रकरणी चौकशी समिती (investigation team) नियुक्त करण्यात आली आहे. जखमींपैकी तीन जणांना पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba hospital) दाखल केले होते. त्यामधील चार महिन्याच्या लहान बाळाचा रात्री मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.   

गॅस सिलेंडर स्फोट

गणपतराव जाधव मार्ग बीडीडी चाळ क्रमांक 3, कामगार वसाहत, वरळी येथे एका घरात काल सकाळी 7.11 वाजता गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घरामध्ये आग लागली. याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत जखमी झालेल्या 4 जणांना मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने या कुटूंबाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नायर रुग्णालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान चार जखमींपैकी एका गंभीर अवस्थेतील रुग्णाला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात भाजलेल्या रुग्णांसाठी विशेष असलेल्या वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे. 

लहान बाळाचा मृत्यू

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यां 4 रुग्णांपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. नायर रुग्णालयात आनंद पुरी वय 27 वर्षे (गंभीर) यांच्यावर तर कस्तुरबा रुग्णालयात विद्या पुरी 25 वर्षे व विष्णू पुरी 5 वर्षे यांच्यावर उपचार सुरु आहेत. काल रात्री गंभीर जखमी असलेल्या मंगेश पुरी या 4 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.  

चौकशीचे आदेश

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये काल सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला आणि एक पुरुष असे चौघे जण भाजले आहेत. घटनास्थळी महानगरपालिका अग्नीशमन दल, विभाग कार्यालयातील यंत्रणा तसेच पोलीस यांनी मदतकार्य करुन चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तथापि, रुग्णालयात संबंधित रुग्णांवर उपचारांमध्ये दिरंगाई झाल्याचा आरोप करणारी चित्रफित निदर्शनास आली असून त्याची तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नायर रुग्णालयाचे उप-अधिष्ठाता सदर दिरंगाई प्रकाराची चौकशी करणार आहेत. चौकशी अंती कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार व कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जखमींची नावे -

नायर रुग्णालय - 

आनंद पुरी 27 वर्षे (गंभीर) 

कस्तुरबा रुग्णालय - 

विद्या पुरी 25 वर्षे (प्रकृती स्थिर) (50 ते 60 टक्के भाजल्या)

विष्णू पुरी 5 वर्षे (प्रकृती स्थिर) (15 ते 20 टक्के भाजला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

SCROLL FOR NEXT