मुंबई : रुग्णालयात विव्हळणाऱ्या रुग्णांवर (Patients treatment in hospital) त्वरेने उपचार न करणाऱ्या मुर्दाड प्रशासनाला (irresponsible authorities) व त्याच्या राजकीय वरिष्ठांना जनतेनेच "मुन्नाभाई एमबीबीएस" होऊन, मतपेटीच्या माध्यमातून (lesson through election voting) धडा शिकवावा, असे आवाहन मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (Sheetal Gambhir desai) यांनी केले आहे.
सिलेंडरस्फोटात भाजलेल्या बालकाचा, नायर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना काल घडली होती. जखमी व्यक्ती रुग्णालयात आल्यावरही तेथील डॉक्टर-नर्स आदींनी त्यांना तसेच तळमळत ठेवल्याचा व्हिडियोदेखील समाजमाध्यमांवर फिरत होता. रुग्ण शेजारी असूनही तेथील कर्मचारी त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचे त्या व्हिडियोत दिसत होते. त्यासंदर्भात देसाई यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अत्यवस्थ रुग्णाच्या नातलगांनी केसपेपर काढला नसल्याने सरकारी रुग्णालयातील डॉक्टर त्याच्यावर उपचार करीत नाहीत. त्यामुळे चिडून "मुन्नाभाई एमबीबीएस" तेथील डॉक्टरलाच आपला हिसका दाखवतो व रुग्णावर उपचार करण्यास त्याला भाग पाडतो, असे दृष्य मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात आहे. चित्रपटांमध्येही शेवटी वास्तव जीवनातील घटनांचाच प्रभाव पडतो. गेली कित्येक वर्षे राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या व महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेच्या राज्यात हे असेच प्रशासन चालत आले आहे. कागदी घोडे नाचविण्याच्या नियमांमुळे त्यांच्याकडून खऱ्या गरजू नागरिकांकडे नेहमीच दुर्लक्ष होते. मग ते रुग्णालयात तळमळणारे रुग्ण असोत वा आपल्या कामांसाठी सरकारी कचेऱ्यांमध्ये खेटे घालणारे अर्जदार असोत, असेही देसाई यांनी दाखवून दिले आहे.
राजकीय वरिष्ठच टक्केवारीच्या हिशोबात गुंतलेले असल्याने प्रशासकीय अधिकारी देखील असे निगरगट्ट होत जातात. त्यामुळे या बेपर्वा राजकारण्यांना मुन्नाभाई स्टाईल हिसका दाखवून सरळ करण्याची वेळ आली आहे. हजारो अधिकाऱ्यांना धडा शिकवीत बसण्यापेक्षा थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या तत्वानुसार मुळावरच घाव घालण्यासाठी राजकीय नेत्यांनाच धडा शिकवायला हवा. हे काम जनतेने मतपेटीच्या माध्यमातून करावे व मुंबईत सुशासन आणावे, असे आवाहनही देसाई यांनी जनतेला केले आहे. भाजप महापालिकेत सत्तेवर आल्यास शाळांचा कारभार सुधारण्याचे वचन मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना पदभ्रष्ट करून सर्वच क्षेत्रात सुशासन आणण्याचा निर्धार जनतेने करावा, असेही देसाई यांनी म्हटले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.