Worli Hit And Run Case esakal
मुंबई

Worli Hit And Run Case: राजेश शहा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा कसा झाला, अंडरवर्ल्ड कनेक्शन काय? कुणी केला धक्कादायक आरोप

Worli Hit And Run Case Update In Marathi: एका मराठी महिलेची रस्त्यावर ज्या प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना आरोपी तीन दिवस सापडत नाही हे कोणाला खरं वाटेल का? त्याच्या शरीरातील नशेचा अमली पदार्थ हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी त्याला तीन दिवस फरार ठेवण्यात आलं आणि आता त्याला आणण्यात आलं आहे.

Sandip Kapde

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गाडीची नंबर प्लेट ही गहाळ असून तिचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांचा न्यायालयात युक्तिवाद झाला. आरोपीला कोणी मदत केली याच तपास करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कस्टडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात धक्कादायक आरोप होत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोपीच्या वडीलांचा सबंध अंडरवर्ल्ड गँगशी असल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत म्हणाले, सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकरण साधं नाही, जसं पुणे प्रकरणात अग्रवाल फॅमिली आहे तशीच इथे मेहता फॅमिली आहे. मुलाचा जो बाप आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासायला हवी. कोणत्या अंडरवर्ल्डशी यांचा संबंध आहेत, तो काय करतो, त्याची प्रॉपर्टी किती आहे, एवढ्या मोठ्या गाड्या कुठून येतात याचा तपास मुंबई पोलिसांना करावा लागेल.हा मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा झाला ज्याचा संबंध अंडरवर्ल्ड गँगशी आहे. बोरवली पोलीस ठाण्यात जाऊन त्याचा रेकॉर्ड तपासा.

मी मुंबई पोलीस आयुक्तांना आव्हान करतो त्याचा रेकॉर्ड समोर आणा. एकनाथ शिंदे सोबत कोणत्या प्रकारची लोक बसली आहेत हे कळेल. हा जो आरोपी आहे जो ड्र्ग्सच्या नशेत होता आणि ही नशा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी तीन दिवसांसाठी त्याला फरार केलं होतं आणि नंतर त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांवरती देखील संशय येऊ शकतो, केलेला प्रकार अत्यंत अमानुष आहे त्यामुळे असा व्यक्ती कारागृहातून सुटू नये, असे संजय राऊत म्हणाले.

जर कोणी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करेल तर रस्त्यावर उतरून लोकांनी पोलिसांना याचं उत्तर मागायला हवं. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून केला जात आहे, कारण मुलाचा जो बाप आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा नेता आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.

गुन्हेगाराला पाठीशी घालणारे सरकार-

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे सरकार हे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार आहे. हे सरकार गुन्हेगारी स्वरूपातून निर्माण झाले असून, अनेक गुन्हेगारांना संरक्षण देऊन बनवले गेले आहे. त्यामुळे यांची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची आहे. गुन्हेगारांना प्रोटेक्शन द्यायचं आणि आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं हा यांचा उद्देश आहे. वरळी हिट अँड रन केसमध्ये नेमकं तेच झालं आहे, ज्या प्रकारे महिलेला रस्त्यावर आणून वारंवार चिरडण्याचा प्रकार झाला. हा एखादा नराधम, नशा आणि पैशाची मस्ती असणाराच नराधम हे करू शकतो.

मराठी फिल्म इंडस्ट्री टाळकुटेपणा करते -

एका मराठी महिलेची रस्त्यावर ज्या प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना आरोपी तीन दिवस सापडत नाही हे कोणाला खरं वाटेल का? त्याच्या शरीरातील नशेचा अमली पदार्थ हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी त्याला तीन दिवस फरार ठेवण्यात आलं आणि आता त्याला आणण्यात आलं आहे. हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे, फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालला पाहिजे. हे कुटुंब मराठी अभिनेते जयंत वाडकर यांचे नातेवाईक आहेत. आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? एरवी आपण कॉमेंट देत असता, आता का टाळकुटेपणा करते मराठी फिल्म इंडस्ट्री? आता का मूग गिळून गप्प बसतात? कसलं मराठीपण आहे तुमच्यामध्ये?, असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT