Worli Hit And Run Case Esakal
मुंबई

Worli Hit And Run Case: 'अपघात झाल्याचं समजलं तरीही अंगावर घातली गाडी अन्...'; वरळी हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Worli Hit And Run Case: अपघात झाल्याची माहिती असताना देखील आणि कावेरी यांना अपघातानंतर बाजुला केलेलं असताना तरीही त्यांच्या अंगावर गाडी चढवली होती अशी माहिती समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतील वरळी परिसरात रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास बीएमडब्ल्यू कारने स्कूटरला धडक दिली, या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अपघात झाल्याची माहिती असताना देखील आणि कावेरी यांना अपघातानंतर बाजुला केलेलं असताना तरीही त्यांच्या अंगावर गाडी चढवली होती अशी माहिती समोर आली आहे. कावेरी या कारचं चाक आणि बंपरमध्ये अडकल्या होत्या. त्यानंतर त्यांना मिहीर शाहा आणि बिडावर यांनी बाजूला काढलं होतं.

गाडीखालून बाजूला काढल्यानंतर त्यांच्या अंगावरून गाडी घातल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटिव्हीमधून या अपघाताचा उडगडा झाला आहे. ही माहिती कोर्टात पोलिसांनी दिली आहे. अपघात झाल्याची माहिती असताना देखील कारने त्यांना फरफटत नेल्यांचं फुटेजमध्ये दिसून येत आहे. त्या कारने जवळपास दिड किलोमीटर त्यांना फरफटत नेलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर शाह नावाचा तरुण त्याची बीएमडब्ल्यू कार चालवत होता आणि त्याच्या शेजारच्या सीटवर दुसरा व्यक्ती बसला होता, जो त्याचा ड्रायव्हर असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आरोपीचे वडिल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत.

वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहिर शाहसोबत त्याचा चालक राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत (वय ३१) उपस्थित होता. वरळी हिट अँड रन प्रकरणी वरळी पोलिसांनी वरळी पोलीस ठाणे येथे मिहिर शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चौकशीसाठी राजेंद्रसिंग बिडावत, राजेश शहा ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मिहिर शहा यालाही नंतर अटक केली आहे. यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडचीही पोलिसांनी चौकशी केली. यापूर्वी पोलीस तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, मिहिर शहा हा शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT