Rajesh Shah 
मुंबई

Worli Hit And Run: अखेर शिंदे गटाला शहाणपण सुचलं! राजेश शहाची शिवसेनेतून हकालपट्टी

Rajesh Shah expelled from Shiv Sena: मुंबई पोलिसांनी मिहीर शहाला मंगळवारी अटक केली होती. राजेश शहा यांना देखील अटक झाली होती. पण, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

कार्तिक पुजारी

मुंबई- अखेर शिवसेना शिंदे गटाने उपनेते राजेश शहा याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. राजेश शहा याचा मुलगा मिहीर शहा याने वऱळीमध्ये एका महिलेला चिरडल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली होती. राजेश शहा याला देखील अटक झाली होती. पण, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.

राजेश शहा हा शिवसेनेचा उपनेता आहे. त्याच्या मुलाने रविवारी सकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या दाम्पत्याला उडवले होते. इतकेच नाही तर महिलेला जवळपास दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. यात महिलेचा मृत्यू झाला होता, तर पती जखमी झाला होता. सदर प्रकरणानंतर आरोपी मिहीर शहाने तिथून पळ काढला होता.

आरोपी मिहीर शहाने अपघातानंतर वडील राजेश शहाला फोन केला होता. यावेळी राजेश शहाने मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच, ड्रायव्हरला आपण गुन्ह्याची जबाबदारी घेण्यास सांगू असं सांगितलं होतं. मिहीर शहा पळून गेल्यानंतर राजेश शहा घटनास्थळी आला होता. त्याठिकाणी ड्रायव्हर राजऋषी बिडावत याला जबाबदारी घेण्यास त्याने सांगितल्याचा आरोप आहे.

सदर घटनेनंतर पोलिसांनी राजेश शहा आणि ड्रायव्हर राजऋषी बिडावत याला अटक केली होती. राजेश शहाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, तर राजऋषी बिडावतला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवत राजेश शहाला जामीन मंजूर केला होता.

राजेश शहावर आरोपीला पळू जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. आरोपी मिहीर शहा तीन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याला अखेर मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याची आई आणि बहिणीला देखील अटक करण्यात आली आहे. आई आणि बहिणीने आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणावरून शिंदे गटावर टीका होत होती. त्यामुळेच शिंदे गटाने राजेश शहाची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

CCTV Crime Footage : पत्नीवरून वारंवार चिडविल्याचा राग मनात धरून पाठलाग करून भर रस्त्यात संपवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

India vs Pakistan Asia Cup 2025 : आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; दुबईतील भारतीय प्रेक्षकांचाही निरुत्साह, कारण काय?

Truck Accident: देऊळगाव महीजवळील भीषण अपघातात ट्रक पलटी; चालक नागेश दहिफळे यांचा जागीच मृत्यू

Panchang 14 September 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT