worali case Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime : वरळी हत्या प्रकरण: वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांच्या तपासाला वेग...

वरळी सीफेस अज्ञात तरुणीचा मृतदेह प्रकरणी पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने मृत मुलीच्या चेहऱ्याची पुनर्निर्मिती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वरळी सीफेस अज्ञात तरुणीचा मृतदेह प्रकरणी पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने मृत मुलीच्या चेहऱ्याची पुनर्निर्मिती पूर्ण झाली आहे. मुलीची ओळख पटविण्यासाठी पोलीसांकडून मुलीचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

4 जुलै रोजी वरळी सीफेस परिसरातील समुद्रात गोणीमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला होता.याप्रकरणी वरळी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठविण्यात आला होता.

चेहऱ्याची पुनर्निर्मिती

पाण्यात मृतदेह बराच काळ राहिल्याने मृतदेहाचा चेहरा खराब झाला होता. परिणामी या प्रकरणी पोलिसाना मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने मृत मुलीच्या चेहऱ्याची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे.

मिळालेल्या मुलीचा मृतदेह 15 ते 17 वयोगटातील असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह समुद्रात फेकण्यात आल्याचा पोलिसांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाची माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

पोलीस कारवाई

याप्रकरणी वरळी पोलिसांनी स्वतः तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. तपासणीत घटनास्थळी सीसी टीव्ही कँमेरा नसल्याचे आढळले आहे. तसेच पाण्यामुळे मृतदेहाचा चेहरा खराब झाल्यामुळे तिची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वरळी पोलिसांनी केईएम रुग्णालयातील तज्ज्ञांच्या मदतीने चेहऱ्याची पुनर्निर्मिती केली आहे.

त्याद्वारे एक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्याचे छायाचित्र वितरीत केले असून पोलिसांनी मृतदेहाची माहिती देणाऱ्याला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी अपहरणाची तीन प्रकरणे सोडविली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT