मुंबई

रस्त्यावरील ‘भंगार’ हटविले

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : पालिका हद्दीतील रस्ते आणि पदपथांवर वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या ६९३ बेवारस वाहनांवर पालिकेमार्फत कारवाई करण्यात आली आहे. रस्त्यावरील ‘भंगार’ हटविल्याने पनवेल पालिका हद्दीतील रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला. पालिका अधिनियमानुसार घेतलेल्या निर्णयानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

पालिकेमार्फत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार स्टिकर लावल्यानंतर देखील हलवण्यात न आलेली वाहने टोईंग व्हॅनने उचलून कर्नाळा स्पोर्टस्‌जवळ असलेल्या तालुका क्रीडा संकुलाजवळ ठेवण्यात आली आहेत. उर्वरित वाहनांना नोटीस चिकटवून वाहने उचलण्याच्या सूचना वाहनमालकांना देण्यात आल्या आहेत.

पालिका हद्दीतील रस्त्यांवर अनेक महिन्यांपासून रस्ते, पदपथ व मोकळ्या जागी उभ्या असलेल्या वाहनांमुळे स्वच्छतेत अडथळा येत आहे. या वाहनांमुळे रहदारीतही अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. अशी वाहने संबंधित मालकांनी तत्काळ हटवावीत, असे आवाहन अनेकदा पालिकेने केले होते; मात्र संबंधित वाहनांच्या मालकांकडून कोणतीच हालचाल न झाल्याने पालिकेमार्फत बेवारस वाहनांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका हद्दीतील चारही प्रभागात करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत ६९३ वाहनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

पालिका हद्दीत प्रभाग क्रमांक ‘अ’मध्ये श्रीराम हजारे, प्रभाग ‘ब’मध्ये हरिश्‍चंद्र कडू, प्रभाग ‘क’मध्ये सुरेश गांगरे व प्रभाग ‘ड’मध्ये दशरथ भंडारी या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यामध्ये प्रभाग ‘ड’ मध्ये ७ वाहनमालकांनी माफीनामा लिहून दिला असून त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच प्रभाग क्रमांक ‘क’मध्ये ३ वाहनमालकांकडून प्रत्येकी ३५०० रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. प्रभाग ‘ड’ मध्ये ७ वाहन मालकांनी माफीनाम लिहून ददिल्‍याने त्‍यांच्याकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

मालकांकडून दंड वसूल 
प्रभाग ‘अ’ मध्ये १२३ वाहनांवर स्टिकर लावण्याची कारवाई केली आहे. तसेच ‘ब’ मध्ये ३८१ वाहनांपैकी  ३०५ वाहने हलवण्यात आली आहेत. तसेच  ४० वाहने उचलण्यात आली असून ३ वाहन मालकांकडून दंड आकारण्यात आला आहे. प्रभाग ‘क’ मध्ये आतापर्यंत ३० वाहने उचलण्यात आली आहेत. तसेच ३ वाहन मालकांकडून प्रत्येकी ३५०० ते १४००० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. प्रभाग ‘ड’ मध्ये २० वाहने जप्त करण्यात आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT