rain 
मुंबई

Corona Effect : यंदा मुंबईकरांना अनुभवावा लागणार प्रखर उन्हाळा अन् दमदार पावसाळा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनमुळे जगभरातील प्रदूषणात घट झाली आहे. परिणामी ऋतुमानावर प्रभाव पडेल, असा निष्कर्ष हवामान शास्त्रज्ञांनी काढला आहे. प्रदूषण कमी झाल्याने सध्या उन्हाचे चटके जास्त जाणवू लागले असून, यंदा पाऊसही दमदार पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सध्या राज्यात पारा चाळिशीपार गेला असून, मुंबईत कमाल तापमान सरासरी 34 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जगात लॉकडाऊन आहे. त्यामुळे हवेचा दर्जा सुधारला आहे. कारखाने, वाहतूक, विमान सेवा ठप्प झाल्यामुळे जगभरातील प्रदूषणात मोठी घट झाली आहे. आशिया, युरोप आणि अमेरिकेतील मुख्य शहरांतील हवेच्या प्रदूषणात या आठवड्यात 60 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये पहिल्यांदाच हिमालयाची शिखरे स्पष्ट दिसू लागली आहेत. आकाश निरभ्र झाले असून, प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे. हवेतील प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी झाले आहे. अडथळ्याशिवाय सूर्यकिरणे पृथ्वीवर दाखल होत आहेत. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग स्पष्ट दिसू लागला आहे. 1980 नंतर प्रथमच वातावरणातील हे बदल प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. 

रीडिंग विद्यापीठातील हवामान तज्ज्ञ लॉरा विल्कॉक्स़ यांच्या अभ्यासानुसार, आशिया खंडातील वायुप्रदूषण कमी झाल्यामुळे यंदा जोरदार पाऊस पडेल. हवेच्या प्रदूषणातील घट कायम राहिल्यास वातावरणावर निश्चितच प्रभाव पडेल. हवेत एरोसॉलचे प्रमाण घटल्यामुळे प्रदूषण अधिक असलेल्या ठिकाणी उष्णतेत वाढ होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

देशात दमदार पावसाळा 
हवेतील प्रदूषण कमी झाल्याने आशिया खंड, विषेशत: भारतात मोठे परिणाम जाणवतील. देशात आगामी चार आठवडे अधिक उष्णतेचे असतील. उत्तर भारतात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दमदार पावसाळा अनुभवण्यास मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

This year, intense summer and heavy rains, reduced pollution air quality improved

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder Case: सोशल मीडियात गणेश काळेच्या हत्येचं समर्थन; बंदुकांसह काडतुसे सोबत ठेवून फोटो

Latest Marathi News Live Update : अतिवृष्टी पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्यात

Mumbai: धक्कादायक! मुंबई कोर्टातच महिला वकिलाला हृदयविकाराचा झटका, लोक सीपीआर देण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात व्यस्त, दुर्दैवी मृत्यू

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT