local train 
मुंबई

तर तुम्हालाही मिळू शकेल लोकल ट्रेनने प्रवास करण्याची सूट

सध्या फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच लोकल प्रवासाची मुभा आहे

कुलदीप घायवट

सध्या फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच लोकल प्रवासाची मुभा आहे

मुंबई: उपनगरीय रेल्वे मार्गावरून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास (Mumbai Local Trains) करण्याची परवानगी अद्याप नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे (General Public) हाल होत आहेत. तसेच लोकल प्रवासाची अनुमती (Permission) नसल्याने नागरिकांना कोरोनाची लस घेण्यासाठी (Corona Vaccination) बाहेर पडणे कठीण होऊन बसले होते. मात्र, आता कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांना लोकल प्रवास (Local Train Travelling) करण्याची मुभा मिळाली आहे. नागरिकांना लोकलचे तिकिट घेण्यासाठी मोबाईलवरील कोरोना लस कुठे घेत आहे? (Where), किती वाजता घेतली जाणार आहे? (When), याची माहिती दाखवणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, सध्या तरी मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांनाच अशा पद्धतीने लोकलमधूनच प्रवास करण्याची अनुमती आहे. पश्चिम रेल्वेने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. (You can travel by Mumbai Local Train for Corona Vaccination with Appointment Details Central Railway Clarifies)

राज्य सरकारने जाहिर केलेल्या 'ब्रेक द चेन' नियमावली अंतर्गत अत्यावश्यक कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण, दिव्यांग यांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकिट मिळण्यापासून ते लोकल प्रवास करण्यापर्यंत वंचित ठेवले आहे. तिकिट खिडकीवर अधिकृत ओळखपत्राशिवाय तिकिट मिळत नसल्याने अनेकजण परतीची वाट धरतात. त्यामुळे ज्यांना कोरोनाची लस घ्यायची असायची, त्यांना देखील परतीची वाट धरावी लागत असायची.

नागरिकांकडून राहत्या घराच्या जवळच्या ठिकाणी कोरोना लसीसाठी नोंदणी केली जात होती. मात्र, अनेक ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा किंवा अन्य कारणाने काही काळ लसीकरण केंद्र बंद होते. त्यामुळे अनेक नागरिकांकडून ज्याठिकाणी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील, अशा केंद्रात नोंदणी करतात. तर, काहींनी कामाला जाण्याच्या ठिकाणातील जवळील लसीकरण केंद्रात नोंद करतात. त्यामुळे याठिकाणी जाण्यासाठी लोकलचा पर्याय उत्तम असल्याने नागरिकांनी लोकलचा प्रवास देण्याची मागणी, तक्रारी केल्या होत्या. रेल्वेच्या टिट्वटर खात्यावर अनेकांच्या यासंदर्भात तक्रारी, विचारणा करण्यात येत होती. त्यानंतर रेल्वेकडून तक्रारकर्त्यांला लोकल प्रवास करता येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, यासाठी लसीकरणासंबंधी कागदपत्रे असणे आवश्यक असल्याचे सांगितले.

ज्या नागरिकांना कोरोनाची लस घ्यायची आहे, अशा नागरिकांना लोकल प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ज्यादिवशी लसीकरण असेल, त्याच दिवसाचे तिकिट दिले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले.

राज्य सरकारने दिलेल्या कॅटेगिरीमधील प्रवाशांना लोकल प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे. यात अन्य कोणत्याही कॅटेगिरी सामील केल्या नाहीत. तसेच अद्याप कोणत्याही प्रवाशाकडून कोरोना लस घेण्यासाठी लोकल प्रवास करण्याची विचारणा पश्चिम रेल्वेकडे केली नाही. त्यामुळे अजून यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. येत्या दिवसात प्रवाशांकडून याविषयी विचारणा केल्यास योग्य तो निर्णय घेण्यात येईल,

-सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT