Vasai Team eSakal
मुंबई

राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

या घटनेचा व्हिडिओ देखील कार्यकर्त्यांनी शेअर केला आहे.

सुधीर काकडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या रागातून वसईत मनसैनिकांनी एकाला चोप दिला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या कार्यकर्त्याला जोरदार मारहाण केल्याचं समजतंय. फक्त मारहाण करून न थांबता मनसैनिकांनी त्या तरुणाची धिंडही काढल्याचं समजतंय. यावेळी कार्यकर्त्याचे कपडेही फाडून टाकण्यात आल्याचं व्हिडिओमधून दिसतंय.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, कल्याणला राहणारी निशा जोशी या महिलेने "एम्पॉवर एचआर सर्व्हिस" या कंपनीची जाहिरात पाहून लिखाण काम करण्याचा प्रोजेक्ट घेतला होता. तो प्रोजेक्ट पूर्ण करून दिल्यानंतर, कंपनीने प्रोजेक्ट मध्ये चुका काढून, पैसे देण्यास टाळाटाळ केली. महिलेने फोन वरून विशाल देवरुखकर याच्याशी संपर्क साधला विशालने महिलेशी असभ्य भाषेत बोलून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल ही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं असा आरोप केला जात आहे.

आक्षेपार्ह वक्तव्याची मोबाईल ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यावर विशाल देवरुखकर यास शोधून वसईच्या कार्यालयाजवळ आणून मनसे पदाधिकऱ्यांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केला. माणिकपूर पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT