drowned 
मुंबई

स्टंटबाजी जीवावर बेतली, सुर्या नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

नविद शेख

मनोर : गुंदले गावच्या हद्दीतील सुर्या नदीपात्रात बुडून एका तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. संजित कनोजिया (17) असे मृत तरुणाचे नाव असून, तो चिल्हार बोईसर रस्त्यावरील मान गावच्या ओस्तवाल वंडर सिटीचा रहिवासी होता.

शुक्रवारी दुपारी आपल्या तीन मित्रांसोबत संजीत कानोजिया गुंदले गावच्या हद्दीतील सुर्या नदीत पोहोण्यासाठी आला होता. तिघेही नदी पात्रात पोहोत असताना बंधाऱ्यावरुन उड्या मारत स्टंटबाजी करीत होते. स्टंटबाजी दरम्यान दोघे जण बंधाऱ्याच्या खालच्या भागात पडल्याने पाण्यात बुडू लागले होते. स्थानिकांनी एका तरुणाला बुडताना वाचवले परंतु संजीतचा दुर्दैवी मृत्यू झाला. बोईसर पोलिसांकडून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. 

जुलै महिन्यात सुर्या नदीच्या बंधाऱ्यावर पोहोण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान सुर्या नदी पात्र बंधाऱ्याच्या भागात धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे सुर्या नदी पात्रात पोहोण्यासाठी येणाऱ्यांना मनाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

Young man drowns in Surya river while doing stunts

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Kidnapping: सोलापुरात १६ वर्षीय मुलीचे अपहरण; २१ दिवसांनंतरही शोध नाही, कुटुंबाचे उपोषण, हस्तक्षेप करणारे आमदार कोण?

राज्य सरकारचा मोठा निर्णय! सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू, १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नेमके काय केले बदल?

Latest Marathi News Live Update : पुण्यात टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकीसह चोर पसार

India Exports: भारताच्या निर्यातीत ऐतिहासिक उच्चांक! ८६३ अब्ज डॉलरचे उत्पन्न, सेवा क्षेत्राचे मोठे योगदान, ‘सेवा निर्यात महासत्ता’ सिद्ध

विजय सरकार स्थापन करणार की राष्ट्रपती राजवट? राज्यपालांच्या एका निर्णयाकडे देशाचं लक्ष, आतापर्यंत अशा परिस्थितीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT