young man went to settle dispute of family violently biting ear dombivali crime police  esakal
मुंबई

Mumbai Crime : भांडण सोडवायला गेलेल्या तरूणाचा कानाचा लचका तोडला; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

नशा करण्यासाठी तो घरच्यांकडे वारंवार पैसे मागत असतो

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - नशा करण्यासाठी पैसे हवे म्हणून तो घरातल्यांशी भांडण करत होता. शेजारी राहणारा तरुण शेजारधर्म म्हणून हे भांडण सोडवायला गेला. याचा राग आल्याने नशेबाज तरुणाने त्याच्या कानाचा लचकाच तोडल्याची घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी जिम खान याला अटक केली आहे.

कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडला असलेल्या मोहल्ल्यात अजीम खान हा तरुण राहतो. तो नशेखोर आहे. नशा करण्यासाठी तो घरच्यांकडे वारंवार पैसे मागत असतो. पैसे न दिल्यास भांडतो. नशेसाठी त्याने घरातील वस्तू देखील विकल्या आहेत. शुक्रवारी त्याने परत नशा करण्यासाठी पैसे हवेत म्हणून घरात भांडण सुरु केले.

जोरजोरात आवाज येत असल्याने अजीमचा भाऊ आणि शेजारी राहणारा त्याचा मित्र अख्तर घरात गेले. त्या दोघांनी अजीम याला पकडून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या अजीम याने जोरदार चावा घेत अख्तरच्या कानाचा लचका तोडला. त्यानंतर नशेखोर अजीमने तेथून पळ काढला. या घटनेनंतर कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अजीमला शोधून अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी सुजित मुंडे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT