lover couple Team eSakal
मुंबई

प्रेमात पडलेल्या तरुणालाही आहे सुरक्षित भविष्याचा अधिकार - POCSO कोर्ट

न्यायालयाने अशाच एका प्रकरणात एका तरुणाला जामीन दिला आहे.

सुधीर काकडे

मुंबईतील पोक्सो विशेष न्यायालयाने (Special POCSO Court) एका प्रकरणाची सुनावणी करताना आरोपी तरुणाच्या बाजून महत्वपुर्ण निकाल दिला आहे. एखादा 20 वर्षीय मुलगा आपल्या अल्पवयीन प्रेयसीसोबत "प्रेम" संबंधात असेल, तर तो स्थिर आणि सुरक्षित भविष्याचा अधिकार आहे न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबईतील एका विद्यार्थ्याला जामीन मंजूर करताना विशेष POCSO न्यायालयाने ही टीप्पणी केली आहे. आपल्या 16 वर्षीय मैत्रीणीसोबत हा मुलगा पळून गेला होता. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी मुलावर अपहरण आणि बलात्काराचा आरोप केला होता.

या प्रकरणातील आरोपी 21 वर्षीय मुलाने 30 दिवस तुरुंगात काढले. पोक्सो न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या एका टीप्पणीचा देखील उल्लेख केला. पौगंडावस्थेतील लैंगिक परिपक्वतेच्या पैलूंवर आणि अशा प्रकरणांमध्ये विचारात घेण्याच्या घटकांवर मुंबई उच्च न्यायालयाने टिप्पणी केली होती. POCSO न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे की, “सध्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा जुना आदेश पूर्णपणे लागू होतोय. फक्त या संबंधांना संमती नाही म्हणून, जर 21 वर्षीय आरोपीला तुरुंगात ठेवलं जात असेल तर ते योग्य नाही. त्याच्यासमोर त्याचं संपूर्ण आयुष्य आहे. सराईत गुन्हेगारांसह त्याला तुरुंगात टाकण्याची गरज नाही. त्याला कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही.

दरम्यान, अशाच एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं होतं की, लैंगिक इच्छा व्यक्तीनुसार वेगवेगळ्या असतात. पौगंडावस्थेतील लैंगिक वर्तन पद्धतींसाठी कोणतंही गणितीय सूत्र असू शकत नाही, कारण जैविक दृष्ट्या मुलं किशोरवयात आल्यावर त्यांना त्यांच्या लैंगिक गरजा समजू लागतात. आजकालची मुलं लैंगिकतेशी संबंधित समस्यांबाबत अधिक जागरूक आहेत. आजच्या काळात, त्यांच्याकडे लैंगिक संबंधांबद्दल जाणून घेण्यासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होतं की, "किशोर वयात मुली आणि मुलं दोघेही उत्तेजित होऊ शकतात. त्यांच्या शरीरात अशा वयात आकर्षण निर्माण होत असतं. उच्च न्यायालयानं असंही म्हटलं होतं की, जेव्हा एखादा मुलगा आणि अल्पवयीन मुलगी प्रेमात असतात आणि पालकांच्या संमतीशिवाय एकत्र राहण्याचा निर्णय घेतात, तेव्हा अशा अर्जांवर निर्णय घेताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: CNG महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Team India Matches Today: वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा अन् स्मृती मानधना एकाच दिवशी मैदानात! केव्हा, कुठे रंगणार आज सामने; एका क्लिकवर वाचा

Suresh Borse Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणी PSIसह अंमलदार निलंबित; अटकेची प्रक्रिया सुरू; संशयितांना वाचवण्याचा होता प्रयत्न

Yavatmal: महसूल मंत्र्यांनी घेतला ‘एसडीओं‘चा क्लास, मिटींगमध्ये बिघडली अधिकाऱ्याची प्रकृती; रुग्णालयात उपचार सुरू

Chandrapur: लाच घेताना दुय्यम निबंधक, ऑपरेटर अटकेत

SCROLL FOR NEXT