मुंबई

धारावीत 'या' वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक! वाचा ही चिंताजनक माहिती आली समोर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः धारावीत कोरोना बाधितांची संख्या पाचशेपार झाला आहे. त्यातही चिंतेची बाब म्हणजे यातील प्रामुख्याने लागण युवकांना झाली आहे तसेच धारावातील रुग्ण असलेल्या वस्त्या वाढत आहेत. 

धारावीतील आकडेवारीचा अभ्यास सुरु आहे. त्यानुसार एक मेपर्यंतच्या रुग्णात 21 ते 40 वयोगटात सर्वाधिक 172 रुग्ण आहेत, त्याचबरोबर 41 ते 50 वयोगटात 85 आहेत. 51 ते 60 वयोगटात 69 तर 60 वर्षावरील 53 आहेत. दहा ते वीस वयोगटातील 27 तर दहा वर्षापेक्षा कमी मुला-मुलींची संख्या सहा आहे. याहून चिंतेची बाब म्हणजे अनेक कामासाठी या भागातील युवा जास्त बाहेर पडत आहेत. तसेच ते घरात थांबण्यास तयार नाहीत आणि त्याच गटातील रुग्णच जास्त आहेत, याकडे अभ्यासक लक्ष वेधतात.
धारावीतील किमान 19 हजार लोक फूड पॅकेटस्् घेण्यासाठी बाहेर जातात. ते समजू शकते, पण लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न केलेल्यात युवकांची संख्याच जास्त आहे. मात्र स्थानिक नेते हे मान्य करण्यास तयार नाहीत. त्यांच्या मते पुरेशी चाचणी होत नसल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

धारावीत 13 एप्रिलला 50 कोरोना रुग्ण होते, तर 17 एप्रिलला शंभरीपार केले. 26 एप्रिलला हीच संख्या 275 होती तर आता तीन मे रोजी हाच आकडा पाचशेपर्यंत गेला. धारावीत कुटुंबातील एक किंवा दोघेच कोरोनाची बाधा झालेले 232 रुग्ण आहेत, तर एकाच कुटुंबातील कीमान तीन ते चार असतील असे 186 रुग्ण आहेत. त्यातच दहा वर्षाखालील मुले मुली आहेत. धारावीतील वस्त्यांनुसार रुग्णांचा आढावा घेतल्यास मुकुंद नगर सर्वाधिक प्रभावीत आहे. तिथे 39 रुग्ण आहेत. त्याखालोखाल कुंची कर्वेनगर, कुंभारपाडा, साठ फूट रोड एरिया, राजीव गांधी नगर आहेत. दरम्यान, नवी नगर, संजय चाळ, टाटा कॉलनी, बस्वेश्वर नगर, संगम गल्ली, अण्णा नगर या नव्या वस्त्यात रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

ऑनलाइन परीक्षा घेण्याची सरकारचीच लायकी नाही! संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या परीक्षेत गडबड, अभिजित दिपके संतापले

Godavari flood tragedy: गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, सावखेडा गावात शोककळा

Marathi News Live Updates : ''गोपीनाथ मुंडे काँग्रेससोबत असते तर...''; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान पुन्हा चर्चेत

MPSC Success : कोकडेवाडीच्या शेतकरी पुत्राचा पराक्रम: संजय शितोळे यांची MPSC दुय्यम निबंधक पदावर निवड

SCROLL FOR NEXT