Train Accidnet Esakal
मुंबई

Train Accidnet: धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन तो रेल्वे...

अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रेन असताना घडली घटना

अंकिता खाणे (Ankita Khane)

अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. कादरूउल्ला रफिक खान असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो चेन्नई एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कादरूउल्ला रफिक खान हा तरुण काल (रविवारी) चेन्नई एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान तो रेल्वेच्या डब्याच्या दरवाज्याजवळ उभा होता. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रेन जात असताना त्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

कादरूउल्ला रफिक खान हा आपल्या नातेवाईकांसोबत मद्रास येथून चेन्नई एक्सप्रेसने कुर्ला येथे जात होता. यावेळी चेन्नई एक्सप्रेस बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ असताना तो मेलच्या दरवाजाजवळ उभा राहिला. दरम्यान तोल जाऊन तो रेल्वेतून बाहेर पडला आणि या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Mumbai Accident News)

मृत कादरूउल्ला याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणाची कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT