उन्हेरे धरणात बुडून डोंबिवली येथील तरुणाचा मृत्यू  Sakal
मुंबई

Dombivli News : उन्हेरे धरणात बुडून डोंबिवली येथील तरुणाचा मृत्यू

सुधागड तालुक्यातील ऊन्हेरे येथील धरणामध्ये बुडून डोंबिवली येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे.

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : सुधागड तालुक्यातील ऊन्हेरे येथील धरणामध्ये बुडून डोंबिवली येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (ता.2) दुपारी दीड वाजता गुरुनाथ साठीलकर यांच्या अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अविनाश दिनेश विचारे (वय 29) राहणार डोंबिवली हा आपल्या मित्रांसमवेत हळदीसाठी सुधागड तालुक्यात आला होता. बुधवारी (ता.1) तो आपल्या मित्रांसमवेत उन्हेरे येथील धरणात पोहण्यासाठी गेला. मात्र पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तो धरणामध्ये बुडाला.

गुरुनाथ साठीलकर यांच्या अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे विजय भोसले, दर्श अभानी, राजेश पारठे, महेश भोसले, विशाल चव्हाण, सौरभ घरत, ओम ठकेकर, जय भोसले, निलेश यादव व प्रदीप गोळे यानी अद्ययावत उपकरणांच्या साहाय्याने या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

यावेळी पाली पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांनी सदर ठिकाणी पंचनामा केला. तर रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश कोळी व पाली पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पालीतील आपदा मित्र अमित निंबाळकर, मिलिंद गोळे व प्रदीप गोळे हे देखील या ठिकाणी पहाटे पाहण्यासाठी गेले होते.

धरणामध्ये उतरू नये

या संदर्भात पाली पोलिसांनी आव्हान केले आहे की उन्हेरे धरण हे तीव्र उताराचे व खोल आहे. येथे पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी कोणीही पोहण्यासाठी व इतर कामासाठी जाऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT