murder sakal
मुंबई

Nalasopara Crime : तरुणाचे अपहरण करून, धारदार हत्याराने हत्या; आरोपी फरार

पूर्ववैमनस्यातून नालासोपा-यात 27 वर्षाच्या तरुणाचे अपहरण करून, त्याची धारदार हत्याराने वार करून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघड झाली.

विजय गायकवाड

नालासोपारा - पूर्ववैमनस्यातून नालासोपा-यात 27 वर्षाच्या तरुणाचे अपहरण करून, त्याची धारदार हत्याराने वार करून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवार ता 12 रोजी उघड झाली आहे. दोन रिक्षात भरून आलेल्या 9 ते 10 जणांच्या ग्रुपने केली असल्याचे समोर आले असून, हत्येनंतर मृतदेह फेकून सर्व आरोपी फरार झाले आहे.

याबाबत गैरकायद्याची मंडळी जमवून, अपहरण करून, निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी पोलीस आयुक्तालयातही गुन्हे शाखेच्या 4 आणि पेल्हार पोलीस ठाण्याच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत.

सुधीर सिंग ( वय 27) असे हत्या झालेल्या तरुणाचे नवा असून, हा कांदिवली येथील राहणारा आहे. 5 वर्षांपूर्वी हा तरुण नालासोपा-यात राहत होता. काल गुरुवारी सुधीर सिंग हा त्याचा मित्र वैभव मिश्रा याच्या सोबत नालासोपारा पूर्व वलईपाडा उपाध्याय नगर चाळीत रूम बघण्यासाठी आला होता. गुरुवारी रात्रीच्या साडे दहाच्या सुमारास 9 ते 10 जणांचे टोळके दोन रिक्षात भरून आले.

गौराईपाडा च्या पार्किंग च्या।मोकळ्या जागेत या टोळक्याने लाकडी दांडे, धारदार हत्याराणे प्रथम त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रिक्षात घालून, गावराईपाडा नाक्यावर नेऊन फेकून दिले आणि सर्व आरोपी फरार झाले.

रात्री साडे बाराच्या सुमारास मयताच्या मित्राने पेल्हार पोलिसनाआ याची माहिती दिली असता, पेल्हार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम पाठवून शोध घेतला असता, रक्ताललेल्या अवस्थेत नालासोपारा पूर्व गावराईपाडा येथे मृतदेह मिळून आला आहे. या अपहरण आणि हत्येच्या थराराने नालासोपारा पूर्व संतोषभूवन, बिलालपाड, श्रीराम नगर, गावराईपाडा, धणीवबाग, नवजीवन परिसरात भीतीचे वातवरण पसरले आहे.

आरोपीनी पूर्ववैमनस्यातून अपहरण करून हत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आम्ही गुन्हा दाखल करून, गुन्हे शाखेच्या 3, मध्यवर्ती गुन्हे शाखा 01, आणि आमच्या तीन अशा 7 वेगवेगळ्या टीम आरोपीचा शोध घेत आहेत. दोघांची ओळख पटली आहे. आम्ही लवकरच आरोपी पकडण्यात यश मिळवू

- वसंत लब्दे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : निजामाचं गॅझेट स्वीकारलं म्हणता मग तुम्ही इंग्रजांच्या परिवारातले आहात का ? मनोज जरांगेंना राग अनावर, जीभ घसरली?

Dussehra 2025: चक्क...या गावात होते रावणाची पूजा? काय आहे नेमकी परंपरा जाणून घेऊयात

Dussehra Melava 2025 Live Update: वणी येथे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संचलन व शस्त्रपूजन उत्साहात

Mangalwedha Farmers : स्वतःचे नुकसान बाजूला ठेवत सरकारलाच 15 रुपये मदतनिधी पाठवला

Latest Marathi News Live Update : शतंचडी यागास पुर्णाहूती व महाआरतीने वणी गडावर नवरात्रोत्सवाची सांगता...

SCROLL FOR NEXT