मुंबई ः टेकफेस्टमध्ये देशभरातून आणि विदेशातूनही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. टेकफेस्टच्या प्रवेशद्वारावरील कलाविष्कार विशेष आकर्षण ठरले आहे. 
मुंबई

इस्रो भेदणार सूर्यमंडळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) २०२२ मध्ये अंतराळात मानवाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्र आणि मंगळावर स्वारीपुरते मर्यादित न राहता सूर्यमंडळ भेदून बाहेर जाण्याचा इस्रोचा विचार आहे, असे ‘ज्ञानगंगा’ मोहिमेच्या संचालक डॉ. व्ही. आर. लताअंबिका यांनी शुक्रवारी सांगितले.

पवई येथील मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये डॉ. लताअंबिका बोलत होत्या. मानवाच्या संशोधक बुद्धीमुळेच आपण अंतराळात पोहोचू शकलो आहोत. दोन महायुद्धांनंतर शीतयुद्धाच्या काळात अंतराळ संशोधनात मोठी प्रगती झाली. देशांमधील चढाओढीमुळेच ही प्रगती झाली, असे त्या म्हणाल्या.

अंतराळ संशोधनात आता भारतही वेगाने पुढे जात आहे. मानवाला अंतराळात पाठवणे, केवळ हेच भारताचे उद्दिष्ट नाही. त्यापुढे जाऊन आपण सूर्यमंडळ भेदून जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. सूर्यमंडळ भेदून बाहेर जाण्यासाठी अग्निबाणाचा वेग प्रकाशवेगाच्या एक पंचमाशापर्यंत जाण्याची गरज असते. सूर्यावरून प्रकाश अवघ्या आठ मिनिटांत पृथ्वीवर पोहोचतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

उजनीत ८१ हजार क्युसेकची आवक! पुण्यातील पश्चिम घाटमाथ्यावर दमदार पाऊस, 3 दिवसांत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता; गतवर्षी धरण 27 मे रोजी प्लसमध्ये, वाचा....

Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

SCROLL FOR NEXT