मुंबई

BMC Khichadi Scam: बीएमसी खिचडी घोटाळाप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; युवासेनेच्या सूरज चव्हाणला अटक

सूरज हा शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंचा विश्वासू असल्यानं हा ठाकरेंसाठी मोठा झटका मानला जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई महापालिकेत कोवीड काळात झालेल्या कथीत खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीनं मोठी कारवाई केली आहे. त्यानुसार, या कथीत घोटाळ्यातील आरोपी युवासेनेचा सरचिटणीस सूरज चव्हाण याला अटक झाली आहे. सूरज हा शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंचा विश्वासू असल्यानं हा ठाकरेंसाठी मोठा झटका मानला जात आहे. (Yuva sena leader Suraj Chavan arrested in BMC Khichdi scam case by ed)

मुंबई महापालिकेतील या खिचडी घोटाळा प्रकरणी यापूर्वी सूरज चव्हाणची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तत्पूर्वी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गुन्हे शाखेकडून सूरजची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत त्याच्या बँक खात्यांच्या तपशीलाबाबत धक्कादायक बाब समोर आली होती. या काळात सूरजच्या खात्यात ३७ लाख रुपये जमा झाले होते. त्यामुळं या मोहिमेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका सूरजवर ठेवण्यात आला होता. (Latest Marathi News)

त्याचबरोबर या घोटाळ्यात आणखी एक नाव होतं, ते म्हणजे अमोल किर्तीकर. किर्तीकरची देखील खिचडी घोटाळा प्रकरणी गुन्हे शाखेनं चौकशी केली होती. किर्तीकरच्या खात्यात ५१ लाख रुपये जमा झाल्याचंही गुन्हे शाखेच्या सूत्रांनी त्यावेळी सांगितलं होतं. त्यामुळं आता सूरज चव्हाणवर अटकेची कारवाई झाल्यानंतर किर्तीकरवरही कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. अमोल किर्तीकर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांचा चिरंजीव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT