घाटकोपर पश्चिम भागातील सर्वोदय सिग्नलवरील गायब झालेल्या थांबारेषा.  
मुंबई

दोष पालिकेचा, शिक्षा वाहनचालकांना!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी सिग्नलवर शहरभरात रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग अर्थात थांबारेषा आखण्यात आली आहेत. कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी सर्वत्र सीसी टीव्ही कॅमेरे बसवले असून त्याचा उपयोग वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी केला जात आहे. मात्र, अनेक सिग्नलवरील थांबारेषा पुसट वा गायब झाल्याने कुठे थांबायचे याचा नेमका अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना कारवाईचा सामना करावा लागत आहे. 

सिग्नल असताना थांबारेषेच्या आत वाहन थांबवणे कायदेशीर आहे. नियम मोडणाऱ्यांवर सीसी टीव्हीच्या मदतीने ऑनलाईन कारवाई केली जात आहे. उपनगरांत बहुतांश सिग्नलवर थांबारेषा पुसट झाल्याने वाहनचालकांना त्या दिसत नसल्याने त्यांच्याकडून नियम मोडला जात आहे. पालिकेच्या दुर्लक्षाचे कारण वाहनचालक ठरत आहेत. झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांची वर्षातून पावसाळ्याच्या नंतर रंगरंगोटी करणे आणि त्याचे परीक्षण करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिस आणि पालिका प्रशासनाची आहे. पालिकेकडून झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, तरीही शहरातील अनेक सिग्नल रस्त्यावरील थांबारेषा पुसट दिसत आहेत. सिग्नलवर थांबारेषा दिसत नसल्याने अनेक वाहने सिग्नलच्या मागे-पुढे थांबत असल्याने सीसी टीव्हीद्वारे त्यांच्या चालकांकडून ऑनलाईन दंड आकारला जात आहे. 
वाहनचालक नियम पाळतात, पण सिग्नलवरील रेषा पुसली असेल तर वाहने नेमकी थांबवायची कुठे? नियम मोडला गेला असेल तर त्याबाबतचा मोबाईल मेसेज पाठवण्याची गरज आहे, असे रिक्षाचालक हनुमंत टाव्हरे म्हणाले. 


प्रतिक्रिया 
थांबारेषा पुसट दिसते, तेव्हा वाहतूक पोलिसांकडून पालिकेला पत्रव्यवहार करणे आवश्‍यक आहे. सिग्नलवरील क्रॉसिंग रेषा रंगवणे पालिकेचे कर्तव्य आहे. थांबारेषा ओलांडणाऱ्या वाहनांवर सीसी टीव्हीद्वारे नजर ठेवली जाते. जे नियम मोडतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. 
- किशोर शिंदे (वाहतूक पोलिस निरीक्षक, दादर) 

सिग्नलवरील थांबारेषा पावसाळ्यानंतर पुसट होतात. दरवर्षी त्या रंगवणे पालिकेचे काम आहे. थांबारेषांसाठी जर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो तर तो जातो कुठे? 
- अनिल गलगली (आरटीआय कार्यकर्ता) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT