raigad esakal
मुंबई

मुंबई : रायगडमध्ये जमावबंदीचा प्रस्ताव

नाताळ सणासाठी येणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची नजर

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटकांनी यंदाही रायगड जिल्ह्याला मोठी पसंती दर्शविली आहे. महिन्याभरापासून जिल्ह्यातील हॉटेल, कॉटेजसाठी झालेले आगाऊ आरक्षण हेच दर्शवित असले तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबर कोरोना नियमावलीचे उल्लंघन होऊ नये यासाठी रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमावबंदीचा प्रस्ताव पाठविला आहे.

२४ डिसेंबरपासून रायगड जिल्ह्यात पर्यटक येण्यास सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्याचे नियोजन केले आहे. वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत वाहन चालविण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नाताळ साजरा करण्यासाठी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांना कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले जाणार आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जमावबंदी लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नाताळ उत्साहात साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये यासाठी वाहतूक शाखा व स्थानिक पोलिसांच्या मदतीने नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये याकडे लक्ष दिले जाणार आहे. यासाठी पथक तैनात केले जाणार आहे. हॉटेल, कॉटेज व्यावसायिकांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याबाबत त्यांना सूचना करण्यात येणार आहेत.

- अतुल झेंडे,

अपर पोलिस अधीक्षक, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची गुप्त भेट; पडद्यामागे घडताएत मोठ्या घडामोडी

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Tirupati Balaji: ‘तिरुपती’चे चार कर्मचारी धर्मावरुन निलंबित; देवस्थानचं अधिकृत प्रसिद्धीपत्रक

Western Railway: मध्यनंतर पश्चिम रेल्वे कोकणवासियांसाठी सरसावली! गणेशोत्सवासाठी सोडणार विशेष गाड्या

Hardik Pandya - Jasmin Walia: हार्दिक - जास्मिन यांच बिनसलं? या घटनेमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT