myfa

video : फिट है तो हिट है!

मानसी कुलकर्णी, अभिनेत्री

माझा फिटनेस : 
प्रत्येक कलाकारानेच नव्हे, तर प्रत्येक माणसाने आपला फिटनेस जपणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी दिवसातून काही वेळ आपल्या स्वतःसाठी काढावा. कलाकारांना तर चित्रीकरण, कार्यक्रम व व्यग्र दिनक्रमातून वेळ काढणे खूपच कठीण जाते. मात्र, बहुतांश सर्वच कलाकार फिटनेस अन् वेलनेसकडे आवर्जून लक्ष देतात. 

सध्या मी ‘स्टार भारत’ या हिंदी वाहिनीवरील ‘सावधान इंडिया’ या मालिकेत प्राजक्ता भोसले या पोलिस निरीक्षकाची भूमिका साकारत आहे. खरंतर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी तशीच देहबोली, आवाज, राहणीमान अन् फिट राहणं गरजेचं असतं. त्यामुळे मी हे आव्हान स्वीकारलं अन् हेवी वर्कआउट करून यशस्वीरीत्या पारही पाडत आहे. जीमला जाणं शक्‍य झालं नाही तर मी सायकलिंग किंवा वॉकिंग करते. मात्र, स्वतःसाठी अन् स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ न काढणं हे पूर्णतः चुकीच आहे. 

फिट राहण्यासाठी दिवसभरात मी दीड तास व्यायाम करते. मला क्रॉस फिट ॲक्‍टिव्हिटी खूप आवडते. मालिकांचं चित्रीकरण सलग चालतं. त्यामुळे क्रॉस फिट ॲक्‍टिव्हिटी खूपच फायदेशीर ठरते. त्यातून ऊर्जा अन् शारीरिक क्षमताही वाढते. मुळात मी खूपच चंचल आहे. त्यामुळे मला फास्ट गोष्टींची गरज असते. त्यासाठी मी एरोबिक्‍सही करते. मध्यंतरी मी योगासनांचाही प्रयत्न केला होता. पण, ते शक्‍य झालं नाही. 

आपलं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आहार ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे सकाळी मी हळद व मीठ टाकून कोमट पाणी पिते. झोपण्यापूर्वीही गरम पाणी पिते. ग्रीन टी व सलाडचा आहारात नेहमीच समावेश असतो. मी दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी हमखास पिते. फळे, कच्च्या भाज्या खाणे हे केस व त्वचेसाठी खूपच महत्त्वाचे आहे. आहारामध्ये कोशिंबिरीचाही समावेश करते. 

चित्रीकरणामुळे अनेकदा खाण्यापिण्याचं गणित बिघडलं जातं. पण, मी सेटवरही घरून बनविलेला डबाच खाते. मात्र, माझा तोंडावर ताबा राहत नाही. मी त्यासाठी वर्कआउट करते. आपलं शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी फास्टफूड व बाहेरचं खाणं टाळते. त्यासाठी मला पाहिजे ते मी घरीच बनविते अन् ते हेल्दीही असते. आहारात दोन पोळ्या, भाजीचा समावेश असतो. भात खात नाही. या सर्व गोष्टी करत असल्यामुळेच मी फिट आहे. 

आहाराबरोबरच मनःशांतीसाठी मला चांगल्या गोष्टी करायलाही आवडतात. मी अनेकदा संगीत ऐकते, वाचन करते. त्याचबरोबर नाटक, सिनेमाला जाते. त्यातूनही मला सकारात्मक ऊर्जा मिळते. आपल्याला आनंद मिळतो, त्या गोष्टी करत राहाव्यात. कारण, अशा गोष्टी आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी गरजेच्या असतात. 
शब्दांकन - अरुण सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT