Zareen-Khan
Zareen-Khan 
myfa

Video : जाड असल्यामुळं ट्रोल झाली, आज फिटनेससाठी घेतीय जोरदार मेहनत

झरीन खान, अभिनेत्री

जाड दिसते म्हणून अभिनेत्री झरीन खानला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. तिनं वजन कमी केलं तर, पोटावरच्या स्ट्रेच मार्क्सवरूनही तिला टार्गेट करण्यात आलं. अनुष्का शर्मा तिच्या बाजूनं खंबीरपणे उभी राहिली. सोशल मीडियावर ट्रोल झाली असली तरी, झरीन खान आपल्या फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेतीय. फिटनेसविषयी काय म्हणतेय पाहा....

आरोग्याबाबत तुझं मत काय? 
- प्रत्येकाच्या आयुष्यात फिटनेस ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. सध्याचे युग खूपच धावपळीचे आहे. मात्र, फिटनेस जीवनाचा अविभाज्य घटक असलाच पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने दररोज कमीत कमी ३० मिनिटे व्यायामासाठी दिलीच पाहिजेत. त्यामुळं मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभतं. व्यायामाकडं दुर्लक्ष स्वत:कडंच दुर्लक्ष केल्यासारखं आहे. आपण आनंदी राहिल्यास आपलं शरीर अन् मनही आनंदी राहतं. हाच अनुभव मला भारतामध्ये ‘जीप बॉलिवूड ट्रेल्स’ या शोसाठी भटकंती करताना आला. 

फिटनेससाठी काय करतेस? 
- मी नियमितपणे व्यायाम करते. मला योगा, प्राणायाम करायला आवडते. त्याचबरोबर वेटलिफ्टिंग, रनिंग, क्‍लाइंब, जंपिंग, पॅकिंग पंचेस, स्ट्रेचिंग, एरिअल योगा असे वेगवेगळे प्रकार करायला आवडतात. हे करतानाच मी खेळांकडंही लक्ष देते. किक बॉक्‍सिंग आणि टेनिसही मला आवडते. भरपूर पाणी पिणं, नियमितपणे फळं खाणं व योग्य वेळी, योग्य आहार घेणं, ही पथ्यंही मी पाळते. त्यातून आपल्याला चांगली शरीरसंपदा लाभते व शरीरही सुदृढ राहतं.  

अभिनयाव्यतिरिक्त  काय आवडते? 
- मला फिरायला खूप आवडतं. त्यामुळं चित्रीकरण नसताना मी हमखास रोड ट्रीप करण्यासाठी जाते. मुंबईपासून जवळ असल्यानं मला लोणावळा खूप आवडतं. त्यामुळं मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबीयांसमवेत मी शनिवार- रविवार रोड ट्रीप काढते. भटकंती करते. त्यातून मला आनंद व सकारात्मक ऊर्जा मिळते. 


(शब्दांकन - अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT