sri-sri-ravi-shankar
sri-sri-ravi-shankar 
myfa

चेतना तरंग : मनावरील प्रभाव लक्षात घ्या...

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

मनावर प्रभाव पाडणारे पाच घटक आहेत : स्थळ, काळ, अन्न, पूर्वसंस्कार व परस्पर संबंध आणि कृती. तुम्ही ज्या प्रत्येक स्थळी असता त्याची मनावर वेगवेगळी छाप पडते. तुमच्या घरातही तुम्हाला हे दिसू शकेल, की वेगवेगळ्या खोलीत तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतात. गाणे, पठण आणि ध्यान झालेल्या खोलीचा मनावर वेगळाच प्रभाव पडतो. समजा तुम्हाला एखादी विशिष्ट जागा आवडली, तर काही काळानंतर ती तशी नसेल, असे दिसेल. काळ हाही एक घटक आहे. दिवसातील वेगवेगळ्या वेळेचा मनावर वेगवेगळा प्रभाव होतो.

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाता. त्याचाही तुमच्यावर बरेच दिवस परिणाम राहतो. पूर्वसंस्कार व कर्म यांची मनावर वेगळीच छाप पडते. सजगता, दक्षता, ज्ञान आणि ध्यान या सर्वांची पूर्वसंस्कार पुसून टाकायला मदत होते. परस्पर संबंध आणि कृती किंवा व्यक्ती आणि घटना यांसारख्या तुमचा संबंध असलेल्या गोष्टींचाही तुमच्या मनावर प्रभाव पडतो. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या सहवासात तुमच्या मनाची एका पद्धतीने वर्तणूक होते आणि इतरांबरोबर तुमच्या मनाची वर्तणूक वेगळ्या प्रकारची असते. या पाच घटकांचा प्रभाव जीवन आणि मनावर पडत असला, तरी हे जाणून घ्या की स्वत्व खूप अधिक सामर्थ्यवान आहे. तुमची ज्ञानात प्रगती होईल, तसतसे तुम्हीच त्या सर्वांवर प्रभाव पाडाल.

इच्छांतून आत्मज्ञानाकडे...
इच्छा, स्वतःबद्दलची जागरूकता आणि कृती हे सर्व त्याच ऊर्जेची अभिव्यक्ती आहेत, जे तुम्ही आहात. त्या तिन्हीपैकी एकावेळी एकाचे वर्चस्व असते. तुमच्या खूप इच्छा असतील, त्या वेळी तुम्ही स्वतःबद्दल जागृत नसाल. इच्छांचे वर्चस्व असते, तेव्हा स्वतःबद्दलची सजगता अगदी खालच्या पातळीवर असते. त्यामुळेच जगभरातील तत्त्वज्ञांनी इच्छांचा नाद सोडून देण्याचा, त्यांचा त्याग करण्याचा सल्ला दिला. सर्वत्र सजगता असते, तेव्हा आनंदाचा उदय होतो. तणाव आणि दुःख हे इच्छांच्या वर्चस्वांचे परिणाम असतात. कृतीचे वर्चस्व असते, तेव्हा अस्वस्थपणा आणि रोग हे परिणाम असतात. तुमच्या कृती आणि इच्छा प्रामाणिकपणे दिव्यत्वाकडे किंवा समाजाच्या कल्याणाकडे वळवल्या जातात, त्या वेळी आपोआप चेतनेचा विकास होऊ लागतो आणि आत्मज्ञान मिळणे निश्चित होते. ‘स्व’ दुःख जाणत नाही आणि मृत्यूही जाणत नाही, तरीही त्यात सर्व संबंधित घटना प्रवाहित होतात. तुम्ही प्रेमात नसता, तेव्हा अलिप्त राहणे सोपे असते. पूर्णपणे प्रेमात असूनही बेचैन नसणे, काळजी घेणे तरीही काळजी न करणे, चिकाटी असणे तरीही प्रक्षुब्ध न होणे ही सर्व स्वत्वाचे तेज दाखवणारी काही स्पष्ट उदाहरणे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT