myfa

दोषारोप आणि दुःख

साधकाला एक उच्च पातळीचा समजूतदारपणा आत्मसात करावा लागेल

श्री श्री रविशंकर, प्रणेते आर्ट ऑफ लिव्हिंग

एका सामान्य माणसाला दुःख ग्रासते, तेव्हा तो त्याच्या भोवतालचे लोक, व्यवस्थापन आणि साऱ्या जगालाच दोष देतो. साधकाला दुःख होते, तेव्हा तो साऱ्या जगाबरोबरच त्याचा अध्यात्ममार्ग, त्याला मिळालेले ज्ञान आणि तो स्वतः या साऱ्यांना दोषी ठरवतो. तसे पाहता साधक न असणेच चांगले... कारण तुम्ही कमी जणांना दोषी मानाल. पण त्याचवेळी साधकाला सुख-आनंद अधिक लाभत असतो. म्हणजे त्याच्या आयुष्यात अधिक प्रेम असते आणि अधिक वेदनाही. जेव्हा आनंद अधिक, तेव्हा विरोधाभाससुद्धा अधिक.तर यासाठी अध्यात्म मार्गावरील साधकाला एक उच्च पातळीचा समजूतदारपणा आत्मसात करावा लागेल, ज्यायोगे तो स्वतःस, मार्गास आणि जगास दोषी ठरवणार नाही.

हे तुमच्या लक्षात येत आहे का?

एकदा का या दोषारोप आणि दुःखांच्या घळीवरून पलीकडे उडी घेता आली, की मग खड्ड्यात पडणे शक्यच नाही. ही फार महत्त्वपूर्ण उडी असेल. ईश्वर कधीही तुमची परीक्षा घेत नाही. परीक्षा घेणे हा अज्ञानाचा भाग झाला. परीक्षा घेऊ पाहणारा कोण असेल? ज्याला तुमच्याबद्दल काही गोष्टी माहीत नाहीत तो. ईश्वराला तर तुमची क्षमता माहीत आहे. मग त्याला तुमची परीक्षा का घ्यावी लागेल? तर मग दुःखं असतातच का? कशासाठी? तुमच्यातील तितिक्षा म्हणजे सहनशीलता वाढवण्यासाठी दुःखांचे प्रयोजन असते... आणि प्रार्थनामय समर्पणाच्या साहाय्याने सहनशीलता वाढवता येते. शिवाय तुमच्या सहनशीलतेला आव्हान करणाऱ्या घटनांनी!

मोह माया

मोहामुळे आपला श्वास अस्थिर होतो आणि अस्थिर श्वासामुळे मनःशांती भंग होते. यामुळे आपले आयुष्य विस्कळित होते आणि आपण दुःखी होतो. आपल्या अस्तित्वाचे अनेक तुकडे होऊन विस्कटून जाण्यापूर्वी त्यांना पुन्हा एकत्र करा आणि तुमच्या श्वासातील अस्थिरता संपवा. समर्पण आणि साधनेच्या साहाय्याने हे शक्य आहे, पण आपल्या आयुष्याचे काय होत आहे, हे बहुतांशी लोकांच्या खूप उशिरा ध्यानात येते. जेव्हा मोहमायेच्या सागराच्या लाटांमध्ये कुणी बुडत असतो, तेव्हा समर्पणाचे लाइफ जॅकेट अंगावर चढवून तो बचाव करणाऱ्या लोकांचा धावा करू शकतो. मोहाच्या भावनांचा प्रतिकार न करता आपल्या अस्थिर श्वासाचे निरीक्षण करा आणि अंतःकरणातील शांत जागी विराजमान व्हा.

सर्वांत प्रथम तुमच्या मोहमायेच्या भावनांना या दिव्य ज्ञानाकडे आणि ईश्वरचरणी घेऊन जा. सामान्य आणि क्षुद्र गोष्टींचा तुम्हाला मोह होत नाही, हे तुमचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला ईश्वराचा जो मोह होतो, ते तुमचे सौंदर्य आहे.

- चेतना तरंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT