चेतना तरंग : ही गोष्ट स्मरणात असू द्या! sakal
myfa

चेतना तरंग : ही गोष्ट स्मरणात असू द्या!

आत्मा तर पूर्ण आनंदच आहे, पण याची जाणीव केवळ ज्ञानोपासनेमुळेच होऊ शकते.

श्री श्री रविशंकर, प्रणेते आर्ट ऑफ लिव्हिंग

आपण किती भाग्यवान आहोत! – ही एकच बाब नेहमी स्मरणात असू द्या. जेव्हा तुम्हाला तुमच्या भाग्याचे विस्मरण होईल, तेव्हा तुम्ही दुःखी व्हाल.

दुःख सांगते की,

  • तुम्ही नकारात्मक गुणांचा संग केला आहे.

  • तुम्ही सकारात्मक गुणांचा संग केला आहे!

तुमचे दुर्गुण तुम्हाला दुःखात लोटतात, तसेच तुम्ही किती महान आहात, किती सगुणांनी परिपूर्ण आहात याची जाणीव कधी कधी तुम्हाला दुसऱ्यांना दोष देण्यास उद्युक्त करते. तुम्ही दुसऱ्याला तुच्छ मानू लागलात की दुःखी व्हाल.

पण अशा दुःखामुळेच तुम्हाला तुमच्या आत्म्याकडे परत येणे शक्य होईल. आत्मा तर पूर्ण आनंदच आहे, पण याची जाणीव केवळ ज्ञानोपासनेमुळेच होऊ शकते. अशी जाणीव अथवा हे ज्ञान दुःखाचे बोट धरून त्याला आत्म्याकडे नेते. ज्ञानाशिवाय दुःख पूर्णत्वाकडे न जाता वाढत जाते. ज्ञानाने मात्र दुःखाला पूर्णत्व येते.

केवळ ज्ञानाच्या शक्तीमुळे आपण दुःखाला ओलांडून पलीकडे जाऊ शकतो. अध्यात्माच्या या मार्गावर तुम्हाला सर्व काही मिळेल. या सुंदर ज्ञानामध्ये अनेक प्रकारचे गंध आहेत. शहाणपण, हास्य, सेवा, साधना, मौन, गीत, नृत्य, उत्सव, यज्ञ, समस्या, तक्रार आणि त्यांचे निवारण, क्लिष्टता आणि सहजता. आणि या सर्वांना मसाला लावून चटकदार करण्यासाठी खूप धमाल गोंधळ!खरेच, जीवन किती रंगीबेरंगी आहे ना!

शिष्यत्व संपते

विद्यार्जनाचा शेवट असतो. ज्ञानोपासना एके दिवशी पूर्ण होते. याचप्रमाणे शिष्यत्वसुद्धा एक दिवस संपते. ही दशा ज्ञान मिळवण्यासाठी असते. होडीतून नदीचे पात्र पार केल्यानंतर होडी कितीही सुंदर असली, तरी आपण होडीतून उतरतोच.

बारा वर्षांमध्ये शिष्य आपले शिक्षण पूर्ण करतो. मग त्याचे गुरू ‘समवर्त’ नावाचा एक विधी साजरा करतात. त्यावेळी ते आपल्या शिष्याला सूचना करतात, की त्याने आता गुरूच्याच पातळीवर व्यवहार करावे आणि ब्रह्मणाला आपल्या अस्तित्वात सामावून घ्यावे. अशा प्रकारे गुरू शिष्याची विद्यार्थीदशा संपवतात.

सखा हा जीवनभर आणि मृत्यूनंतरही सोबत असणारा आपला प्रिय साथीदार असतो. सख्याला फक्त प्रेम हवे आहे. सख्याला फक्त प्रेमाचीच आस आहे. ज्ञान किंवा मुक्तीबाबत त्याला काहीही पर्वा नाही. त्याचे प्रेम अनंत आहे आणि अनंत हे कधी पूर्ण होतच नाही. या अनंत अपूर्णत्वामध्येच त्याचे प्रेम पूर्ण आहे! प्रेमाच्या मार्गाचा तसा शेवट नाहीच.

अर्जुन हा कृष्णाचा सखा होता आणि कृष्ण परीपूर्ण आणि निर्दोष गुरू असूनही अर्जुनाचा सखाच होता. तुम्ही कोण आहात? एक शिष्य? की एक सखा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT